ETV Bharat / sitara

उत्तम प्रकृतीसाठी शुभेच्छा देणाऱ्या सर्वांचे बिग बी अमिताभ यांनी मानले आभार - अभिषेक बच्चन

बच्चन कुटुंबासाठी सदिच्छा तसेच प्रार्थना व्यक्त करणाऱ्या सर्वांचे रुग्णालयात असलेल्या अमिताभ यांनी ट्वीट करुन आभार मानले आहेत.

अमिताभ
अमिताभ
author img

By

Published : Jul 13, 2020, 11:36 AM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाली असून उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बच्चन कुटुंबासाठी सदिच्छा तसेच प्रार्थना व्यक्त करणाऱ्या सर्वांचे रुग्णालयात असलेल्या अमिताभ यांनी ट्वीट करुन आभार मानले आहेत.

अभिषेक, ऐश्वर्या, आराध्या आणि माझ्यासाठी ज्यांनी चिंता व्यक्त केली, त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. मला प्रत्येकाला प्रतिसाद देण शक्य होणार नाही. तुम्ही दाखवलेले प्रेम आणि आपुलकीसाठी मी हात जोडून सर्वांचे एकत्र आभार मानतो, असे टि्वट अमिताभ यांनी केले आहे.

अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांना काल शनिवारी कोरोना झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर ऐश्वर्या राय, जया बच्चन आणि आराध्या यांचीही तातडीनं कोरोना चाचणी करण्यात आली. ऐश्वर्या आणि आराध्या यांचा रिपोर्ट पॉझिटव्ह आला तर जया बच्चन यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता नंदा, त्यांचा मुलगा अगस्त्या आणि मुलगी नव्या यांचेही रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.

अमिताभ आणि अभिषेक बच्चन यांना नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्या दोघांचीही प्रकृती स्थिर आहे. तर, ऐश्वर्या व आराध्या यांना जलसा बंगल्यातच होम क्वारंटाइन करण्यात आले आहे. बच्चन कुटुंबातील चारजण कोरोना पॉझिटिव्ह आल्याने ते राहत असलेले चार बंगले महापालिकेने सील केले आहेत. तसेच बच्चन यांच्या बंगल्यात काम करणाऱ्या 54 कर्मचाऱ्यांचे स्क्रीनिग करून टेस्टिंग करण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.