मुंबई (महाराष्ट्र) - चित्रपट निर्माता संजय लीला भन्साळी दिग्दर्शित गंगूबाई काठियावाडी हा बहुप्रतीक्षित चित्रपट 25 फेब्रुवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. यात आलिया भट्ट मुक्या भूमिका साकारत आहे. भन्साळी प्रॉडक्शनने त्यांच्या अधिकृत इंस्टाग्रामवर चित्रपटाची नवीन रिलीजची तारीख जाहीर केली.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
'गंगुबाई काठीवाडी' चित्रपटाच्या निमित्ताने आलिया भट्ट पहिल्यांदाच संजय लीला भन्साळींच्या चित्रपटात भूमिका साकारताना दिसणार आहे. यापूर्वी ती सलमान खानसोबत 'ईन्शाल्ला' चित्रपटात दिसणार होती. संजय लीला भन्साळीच या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार होते. मात्र, काही कारणास्तव सलमानने या चित्रपटातून माघार घेतली. त्यामुळे आलिया भट्ट आता त्यांच्या 'गंगुबाई काठीवाडी'मध्ये भूमिका साकारणार आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
गंगुबाई काठीवाडी हा एक बायोग्राफिकल चित्रपट आहे. हुसैन झैदी यांच्या 'माफिया क्विन ऑफ मुंबई' या पुस्तकावर आधारित हा चित्रपट राहणार आहे.
संजय लीला भन्साळींनीच या चित्रपटाची कथा लिहिली आहे. तसेच, त्यांच्या निर्मितीखाली आणि दिग्दर्शनाखाली हा चित्रपट तयार होणार आहे. दीपिका पदुकोण, रणबीर कपूर यांचीही यामध्ये पाहुण्या कलाकाराची भूमिका राहणार असल्याचं बोललं जात आहे. तर, विजय राज आणि विनय पाठक यांचीही काही अशंत: भूमिका पाहायला मिळेल.
भन्साळी प्रॉडक्शन आणि जयंतीलाल गडा यांच्या पेन इंडिया लिमिटेड सह-निर्मित गंगूबाई काठियावाडीमध्ये अजय देवगण देखील एका मनोरंजक भूमिकेत आहे. 72 व्या बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात या चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमियर होणार आहे.
हेही वाचा - ट्विंकल म्हणते, तिचा 'माल' अक्षय 'जुन्या व्हिस्की'सारखा !!