ETV Bharat / sitara

आलिया भट्टची 'हार्ट ऑफ स्टोन'मधून हॉलिवूड एन्ट्री, गॅल गडॉटसोबत करणार पदार्पण - gal gadot film heart of stone

आलिया भट्ट नेटफ्लिक्स मालिका 'हार्ट ऑफ स्टोन'मध्ये हॉलिवूड अभिनेत्री गॅल गॅडोटसोबत दिसणार आहे. आलियाचा हा चित्रपट तिच्या हॉलिवूड प्रवासाची सुरुवात असेल. आलियाच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या गंगूबाई काठियावाडी या चित्रपटाने तिला जगभरात स्टार बनवले आहे.

आलिया भट्ट
आलिया भट्ट
author img

By

Published : Mar 8, 2022, 10:44 AM IST

मुंबई - बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्ट हिचा प्रसिध्दीचा आलेख गगनाला पोहोचला आहे. आता आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आलियाच्या चाहत्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडणारी आलिया भट्ट आता हॉलिवूडमध्ये जाणार आहे. होय, आलिया भट्ट नेटफ्लिक्स मालिका 'हार्ट ऑफ स्टोन'मध्ये हॉलिवूड अभिनेत्री गॅल गॅडोटसोबत दिसणार आहे. आलियाचा हा चित्रपट तिच्या हॉलिवूड प्रवासाची सुरुवात असेल. आलियाच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या गंगूबाई काठियावाडी या चित्रपटाने तिला जगभरात स्टार बनवले आहे.

आलिया भट्टची 'हार्ट ऑफ स्टोन'मधून हॉलिवूड एन्ट्री

आलिया भट्टच्या करिअरमध्ये असे काही चित्रपट आहेत, ज्यांनी अभिनेत्रीला जगभरात स्टार बनवले आहे. यात रणवीर सिंगसोबतच्या 'गली बॉय' या चित्रपटाचा समावेश आहे, ज्याने बर्लिन फिल्म फेस्टिव्हलला हादरवले होते. हा चित्रपट आंतरराष्‍ट्रीय स्‍तरावर हिट ठरल्‍याचे बोलले जात होते. 'गली बॉय' हा चित्रपट ऑस्कर 2020 मध्ये सर्वोत्कृष्ट परदेशी भाषेतील चित्रपट म्हणून भारताने सादर केला होता. त्याचबरोबर आलियाच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'गंगूबाई काठियावाडी' या चित्रपटाने बर्लिन फिल्म फेस्टिव्हलमध्ये झेंडा रोवला होता.

गंगूबाई काठियावाडी 100 कोटी क्लबच्या जवळ आहे. चित्रपटाचे कमाई कलेक्शन 93 कोटींवर पोहोचली आहे. 25 फेब्रुवारीपासून हा चित्रपट थिएटरमध्ये आहे. अशा परिस्थितीत आलियाचे ग्लॅमर आणि प्रसिद्धी हॉलिवूडपर्यंत पोहोचली आहे. नेटफ्लिक्सच्या हार्ट ऑफ स्टोनमध्ये आलिया भट्टला पाहणे चाहत्यांसाठी खूप मजेदार असणार आहे. 'हार्ट ऑफ स्टोन' हा एक स्पाय थ्रिलर चित्रपट असणार आहे, ज्यामध्ये '50 शेड्स ऑफ ग्रे' स्टार जेमी डोर्नन देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

हेही वाचा - Womens Day Special : 'घर महिलांच्या नावे असावे ही पॉलिसी'; महिला धोरणाबाबत मंत्री यशोमती ठाकूर यांच्याशी बातचीत

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.