मुंबई - आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचा पहिला चित्रपट 'ब्रह्मास्त्र' च्या शुटिंगला पाच वर्षे पूर्ण झाली आहेत. नुकतेच या चित्रपटाच्या शेवटचे शेड्यूल काशी (वाराणसी) येथे पूर्ण झाले आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक अयान मुखर्जी आणि मुख्य कलाकार आलिया भट्ट आणि रणबीर सिंग यांनी शूटिंग संपवून काशी मंदिराला भेट दिली. या सर्व सेलिब्रिटींनी येथून सुंदर फोटोही शेअर केले आहेत.
यापूर्वी आलिया आणि रणबीर जेव्हा वाराणसीमध्ये 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाचे शूटिंग करत होते, तेव्हा त्यांच्या येथील सीनशी संबंधित अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यादरम्यान आलिया-रणबीर अनेक ठिकाणी शूटिंग करताना दिसले. चित्रपटाचे चित्रीकरण वाराणसीच्या रस्त्यांवर आणि नदीच्या काठावर करण्यात आले आहे. या चित्रपटाचा निर्माता करण जोहर आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
चित्रपट पूर्ण झाल्यावर काशीच्या मंदिराला भेट दिली - चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केल्यानंतर जवळपास पाच वर्षांनी अयान, रणबीर आणि आलियाने काशीच्या मंदिराला भेट दिली. तिघांनीही आपापल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर दर्शनाचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिन्ही सेलिब्रिटींच्या गळ्यात फुलांचा हार दिसत आहे.
एका फटोत रणबीर हात जोडून उभा आहे, तर आलिया-अयान हसताना दिसत आहेत. हे फोटो शेअर करताना दिग्दर्शक अयान मुखर्जीने त्याच्या इंस्टाग्रामवर लिहिले, 'आणि अखेर चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले, ब्रह्मास्त्रचा पहिला शॉट घेतल्यानंतर ५ वर्षांनी, आम्ही अखेरचा सीन शूट केला, अगदी अविश्वसनीय, आव्हानात्मक, आयुष्यभराचा प्रवास. .''
अयान पुढे लिहितो, 'काही नशिबाचा हात आहे की आम्ही वाराणसी, भगवान शिवाच्या आत्म्याने भरलेल्या शहरात आणि तेही सर्वात पवित्र काशी विश्वनाथ मंदिरात शिवाचे शूटिंग पूर्ण केले. जिथे आम्हाला पवित्रता, आनंद, वातावरण आणि आशीर्वाद लाभले. हा चित्रपट यावर्षी 9 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होत आहे.
शूटिंग पूर्ण झाल्यावर काय म्हणाली आलिया भट्ट - आलिया भट्टने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर वाराणसीचे काही फोटो शेअर केले आणि लिहिले की, 'आम्ही या चित्रपटाची शूटिंग २०१८ मध्ये सुरू केले होते आणि आता ब्रह्मास्त्र भाग १ चे शूटिंग पूर्ण झाले आहे. भेटू सिनेमागृहात- ०९.०९.२०२२. विशेष म्हणजे या चित्रपटात अमिताभ बच्चन, नागार्जुन आणि मौनी रॉय हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
हेही वाचा - दुबई एक्स्पोमध्ये मंत्री अनुराग ठाकूर यांचा रणवीर सिंगसोबत डान्स, पाहा व्हिडिओ