मुंबई - सुपरस्टार अक्षय कुमारच्या अॅक्शन कॉमेडी बच्चन पांडेने पहिल्या दिवशी 13.25 कोटी रुपये कमावल्याचा दावा निर्मात्यांनी शनिवारी केला. साजिद नाडियादवाला निर्मित, बच्चन पांडे शुक्रवारी रिलीज झाला. यात एका गँगस्टरची भूमिका अक्षय कुमारने साकारली आहे. नाडियादवाला ग्रॅंडसनच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटने एक पोस्टर शेअर केली आहे, ज्यात चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या बॉक्स ऑफिस कमाईचा उल्लेख आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
"बॉक्स ऑफिस पे भौकाल. 13.25 कोटी रुपये, पहिल्या दिवशीचे कलेक्शन," असे पोस्टरमध्ये लिहिले आहे. हाऊसफुल 4 फेम फरहाद सामजी दिग्दर्शित या चित्रपटात क्रिती सेनॉन, जॅकलीन फर्नांडिस आणि अर्शद वारसी यांच्याही भूमिका आहेत. व्यापार निरीक्षकांच्या मते, विवेक अग्निहोत्री-दिग्दर्शित द काश्मीर फाइल्स चित्रपटाशी बॉक्स ऑफिसवर मोठी स्पर्धा असतानाही बच्चन पांडेने आपली उत्तम कामगिरी केली आहे.
1990 मधील काश्मिरी पंडितांच्या नरसंहाराभोवती फिरणारी काश्मीर फाइल्स या चित्रपटाची कथा 11 मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाली होती. बॉक्स ऑफिसवर अंदाजे 116 कोटी रुपये कमावले आहेत. अनुपम खेर, दर्शन कुमार, मिथुन चक्रवर्ती आणि पल्लवी जोशी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या काश्मीर फाइल्सला उत्तर प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा, कर्नाटक, त्रिपुरा आणि गोवा या राज्यांमध्येही करमुक्त घोषित करण्यात आले आहे.
हेही वाचा - कोणत्या निकषावर चित्रपट करमुक्त होतो? 'झुंड' निर्मातीचा सरकारला सवाल