मुंबई - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची परवानगी मिळाल्यानंतर अभिनेता अक्षय कुमार आपल्या आगामी ‘राम सेतु’ चित्रपटाचे चित्रीकरण अयोध्येत करणार आहे. सरकारच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, अक्षय कुमार मंगळवारी रात्री मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये यूपीच्या मुख्यमंत्र्यांना भेटला. अक्षय यांनी सामाजिक संदेशाद्वारे चित्रपट बनवण्याच्या प्रयत्नांचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले.
योगी आदित्यनाथ सरकारने उत्तर प्रदेशात चित्रपट निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी उचलेल्या पाऊलांचे कौतुक अक्षय कुमारने केले.
विशेष म्हणजे नोव्हेंबरच्या दिवाळीत अक्षयने राम सेतु नावाच्या आपल्या नव्या चित्रपटाची घोषणा केली होती.
हेही वाचा - कंगना रणौत म्हणते, 'हे' लोक मला महान करुनच सोडतील
त्यांनी ट्वीट केले होते की, "या दिवाळीत, रामाचे आदर्श जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करूयात. एक सेतू जो भावी पिढ्यांना जोडेल. हे विशाल कार्य पुढे नेण्यासाठी आमचा एक विनम्र प्रयत्न."
या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक शर्मा करणार आहेत. लॉकडाउननंतर सिनेमागृहात प्रदर्शित होणारा त्याचा 'सूरज पे मंगल भारी' हा बॉलिवूडचा पहिलाच चित्रपट ठरला आहे.
अक्षयचे प्रॉडक्शन हाऊस 'राम सेतु' निर्मित करेल.
हेही वाचा - 'दरबान'मधील शरिब हाश्मीची भूमिका पाहून उत्तम कुमारशी होतेय तुलना