ETV Bharat / sitara

उन्नाव अत्याचार प्रकरणी ट्विंकलने ट्विट केल्यानंतर अक्षय कुमारवर तुटून पडले ट्रोलर्स

उन्नाव अत्याचार प्रकरणी अक्षय कुमारने मौन बाळगणे युजर्सना खटकले आहे. मात्र यावर मौन त्याने बाळगल्याचे दिसते. यामुळे त्याला युजर्सनी धारेवर धरले आहे.

अक्षय कुमार, ट्विंकल खन्ना
author img

By

Published : Jul 31, 2019, 11:54 PM IST

मुंबई - उत्तर प्रदेशातील उन्नाव अत्याचार प्रकरणातील पीडितेला पाठींबा देण्यासाठी अनेक सेलेब्रिटीजनी ट्विटरवर मोहिम चालवली आहे. या मध्ये ट्विंकल खन्नानेदेखील पीडितेला न्याय मिळाला पाहिजे अशी ट्विटरवर भूमिका घेतली. मात्र अक्षय कुमारने यावर मौन बाळगल्याचे दिसते. यामुळे त्याला युजर्सनी धारेवर धरले आहे.

ट्विंकल खन्नाच्या ट्विटनंतर अक्षय कुमारने मौन बाळगणे युजर्सना खटकले आहे. तो नेहमी संवेदनशील विषयावर आपले मत व्यक्त करीत असतो. अशातच उन्नाव पीडितीचे प्रकरण देशभर चर्चेचा विषय ठरले आहे. यामुळे अक्षय कुमारवर ट्विटर युजर्स तुटून पडले आहेत.

ट्विंकलने ट्विटरवर लिहिले आहे, "या मुलीला न्याय मिळेल अशी मी प्रार्थना करते. ही घटना भयावह आहे. ट्रकच्या नंबर प्लेटवर काळे फासणे स्पष्ट करते की, ही घटना अपघात नाही. या ट्विटनंतर अक्षय कुमारवर टीकेची झोड उठली आहे."

लोकसभा निवडणूकीच्यावेळी अक्षय कुमारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नॉन पॉलिटिकल मुलाखत घेतली होती. तो नेहमी आपली प्रतिमा उजळ राखण्याचा प्रयत्न करीत असतो. अशा पार्श्वभूमीवर त्याच्यावर टीका सुरू झाली आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.