मुंबई - बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांची तब्येत गंभीर आहे. माहितीनुसार त्यांना मुंबईतील हिरानंदानी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आईची प्रकृती गंभीर असल्याची बातमी मिळताच अक्षय कुमार तत्परतेने लंडनहून मुंबईत दाखल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांच्यावर गेल्या काही दिवसापासून मुंबईतील हिरानंदानी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गेल्या काही दिवसापासून अक्षय सिंड्रेल सिनेमाच्या शुटिंगसाठी लंडनमध्ये गेला होता. आई तब्येत गंभीर झाल्याची माहिती मिळताच त्याने तातडीने मुंबईला परतण्याचा निर्णय घेतला आहे.
अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया या ७७ वर्षांच्या आहेत. त्यांनी हॉलिडे, नाम शबनम अशा चित्रपटांची निर्माती म्हणून काम पाहिले आहे.
हेही वाचा - बिग बॉस ओटीटीमध्ये सिध्दार्थ शुक्लाच्या आठवणीने गहिवरला करण जोहर