ETV Bharat / sitara

हाऊसफुल्ल-४ बद्दल अक्षय म्हणतो; जितकी इज्जत कमवली, ती सगळी जाईल - रितेश देशमुख

आतापर्यंत सामाजिक विषयांवर आधारित चित्रपट बनवून जितकी इज्जत कमावली, ती सगळी हाऊसफुल्ल ४ मध्ये निघून जाईल, असं अक्षय म्हणाला. अक्षयचा हाऊसफुल्ल-४ चित्रपट दिवाळीमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

हाऊसफुल्ल ४वर अक्षयची प्रतिक्रिया
author img

By

Published : Aug 21, 2019, 5:59 PM IST

मुंबई : 'टॉयलेट-एक प्रेम कथा' ते 'पॅडमॅन'सारख्या सध्याच्या आपल्या बहुतेक चित्रपटांतून बॉलिवूडचा खिलाडी कुमार काहीतरी सामाजिक संदेश देताना दिसतो. नुकतंच एका माध्यमाने घेतलेल्या मुलाखतीत अक्षयला त्याच्या अशा भूमिकांबद्दल प्रश्न विचारण्यात आला.

या प्रश्नाला अक्षयनं अगदी मजेशीर उत्तर दिलं. आतापर्यंत सामाजिक विषयांवर आधारित चित्रपट बनवून जितकी इज्जत कमावली, ती सगळी हाऊसफुल्ल ४ मध्ये निघून जाईल, असं अक्षय म्हणाला. अक्षयचा हाऊसफुल्ल ४ चित्रपट दिवाळीमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

नोव्हेंबर महिन्यातच या सिनेमाचं चित्रीकरण पूर्ण झालं. यात अक्षयशिवाय रितेश देशमुख, क्रिती सेनॉन, बॉबी देओल, राणा दग्गुबती, पूजा हेगडे आणि चंकी पांडे या कलाकारांच्याही महत्त्वाच्या भूमिका असणार आहेत. मिशन मंगलच्या यशानंतर आता अक्षय या सिनेमातून प्रेक्षकांची मनं जिंकण्यात यशस्वी ठरतो का? हे पाहणं रंजक ठरणार आहे.

Intro:Body:

हाऊसफुल्ल ४बद्दल अक्षय म्हणतो; जितकी इज्जत कमवली, ती सगळी जाईल  

मुंबई - टॉयलेट - एक प्रेम कथा ते पॅडमॅन सध्याच्या आपल्या बहुतेक चित्रपटांतून बॉलिवूडचा खिलाडी कुमार काहीतरी सामाजिक संदेश देताना दिसतो. नुकतंच एका माध्यमाने घेतलेल्या मुलाखतीत अक्षयला त्याच्या अशा भूमिकांबद्दल प्रश्न विचारण्यात आला.

या प्रश्नाला अक्षयनं अगदी मजेशीर उत्तर दिलं. आतापर्यंत सामाजिक विषयांवर आधारित चित्रपट बनवून जितकी इज्जत कमावली, ती सगळी हाऊसफुल्ल ४ मध्ये निघून जाईल, असं अक्षय म्हणाला. दरम्यान अक्षयचा हाऊसफुल्ल ४ चित्रपट दिवाळीमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

नोव्हेंबर महिन्यातच या सिनेमाचं चित्रीकरण पूर्ण झालं. यात अक्षयशिवाय रितेश देशमुख, क्रिती सेनॉन, बॉबी देओल, राणा दग्गुबती, पुजा हेगडे आणि चंकी पांडे या कलाकारांच्याही महत्त्वाच्या भूमिका असणार आहेत.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.