मुंबई - 'सुर्यवंशी' चित्रपटाबद्दल सोशल मीडियावर कोणत्याही प्रकारच्या निगेटीव्ह प्रतिक्रिया न देण्याचे आवाहन अक्षय कुमारने केले आहे. काही दिवसापूर्वी 'सुर्यवंशी' चित्रपटाचे रिलीज २७ मार्चला करण्याचा निर्णय दिग्दर्शक रोहित शेट्टीने घेतला होता. सलमान खानच्या 'इन्शाल्लाह' या चित्रपटासोबत 'सुर्यवंशी'ची बॉक्स ऑफिसवर होणारी टक्कर रोखण्यासाठी रोहितने हा बदल केला होता.
![Akshay Kumar apeal to fans](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/3570559_aki.jpg)
रिलीजची तारीख बदलल्यानंतर अक्षयच्या चाहत्यांनी जोरदार मोहिम सुरू करीत रोहित शेट्टीला टारगेट केले होते. या पार्श्वभूमीवर अक्षयने पुढाकार घेऊन चाहत्यांना आवाहन केले आहे.
अक्षयने चाहत्यांना उद्देशून लिहिलंय, "गेल्या काही दिवसापासून माझे प्रिय लोक निगेटीव्ह ट्रेंड्स चालवीत आहेत. मी तुमचा राग पाहू शकतो, समजू शकतो आणि हात जोडून मी विनंती करतो की, अशा ट्रेंड्सपासून हात आखडते ठेवा."
अक्षयने नेटीझन्सना सकारात्मक दृष्टीकोन स्वीकारण्याचा सल्ला दिलाय. या चित्रपटात अक्षय कुमारसोबत कॅटरिना कैफ, गुलशन ग्रोव्हर आमि सिकंदर खेर यांच्या भूमिका आहेत.