मुंबई - यंदाचं वर्ष हे कियारा अडवाणी आणि अक्षय कुमार या दोघांसाठीही खास ठरलं. अक्षयच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या मिशन मंगल चित्रपटानं केवळ ५ दिवसात बॉक्स ऑफिसवर १०० कोटींचा आकडा पार केला. तर दुसरीकडे कियाराच्या कबीर सिंगनंही बॉक्स ऑफिसवर अनेक नवे विक्रम रचले.
यंदा आपल्या धमाकेदार अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकणारी ही जोडी आता लवकरच लक्ष्मी बॉम्ब सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून कियाराने सोशल मीडियावर या चित्रपटाच्या सेटवरील एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत ती अक्षयसोबत पोज देताना दिसत आहे. फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये तिनं म्हटलं, लक्ष्मी बॉम्ब.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
याआधी या सिनेमातील अक्षय कुमारचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला होता. चित्रपटात अक्षय एका अशा व्यक्तीची भूमिका साकारणार आहे, ज्याला ट्रान्सजेंडर भूताने पछाडले आहे. लक्ष्मी बॉम्ब हा कांचना या तामिळ चित्रपटाचा हिंदी रिमेक असणार आहे