ETV Bharat / sitara

हाऊसफुल 'कुमार' आणि ‘शुटर दादी’ भूमि पेडणेकर बनले सर्वाधिक लोकप्रिय

आपली फिल्म ‘हाऊसफुल-4’च्यामूळे बॉलीवुड सुपरस्टार अक्षय कुमार स्कोर ट्रेंड्स इंडिया लोकप्रियता चार्टवर सर्वोच्च स्थानावर आहे. तर ‘सांड की आंख’ चित्रपटामूळे प्रतिभावान अभिनेत्री भूमि पेडणेकर अभिनेत्रींच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. अमेरिकेच्या स्कोर ट्रेंड्स इंडिया या मिडिया-टेक कंपनीने लोकप्रियतेच्या निकषांवर आधारित ही लिस्ट दिली आहे.

score trends India popular chart
author img

By

Published : Nov 12, 2019, 1:45 PM IST

‘मिशन मंगल’ आणि ‘हाउसफुल-4’च्या यशानंतर खिलाडी कुमार सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. 88 गुणांसह पहिल्या क्रमांकावर असलेल्या अक्षय कुमारने लोकप्रियतेत किंग खानला मागे टाकलंय. 69 गुणांसह शाहरूख खान दूस-या स्थानावर आहे. शाहरुखच्या टेड टॉक शो आणि नुकत्याच साज-या झालेल्या वाढदिवसामूळे डिजीटल, सोशल आणि प्रिंट पब्लिकेशन्समध्ये शाहरूखची लोकप्रियता वाढलेली दिसून आलीय.

‘सांड की आंख’ चित्रपटातल्या परफॉर्मन्समूळे भूमि पेडणेकर बॉलीवूड अभिनेत्रींच्या यादीत लोकप्रियतेत सर्वोच्च पदावर आहे. 53 गुणांसह नंबर वन स्थानावर असलेल्या भूमीची सहकलाकार आणि ह्या चित्रपटातली दूसरी ‘शूटर दादी’ म्हणजेच अभिनेत्री तापसी पन्नू 47 गुणांसह दूस-या स्थानावर आहे.

score trends India popular chart
स्कोर ट्रेंड्स इंडिया लोकप्रियता चार्ट

बॉलीवुडचे बादशाह अमिताभ बच्चन आपल्या लोकप्रिय गेम शो ‘कौन बनेगा करोडपती’ (KBC) च्यामूळे तिस-या क्रमांकावर आहेत. सुपरस्टार सलमान खान मात्र आश्चर्यकारकपणे सध्या चौथ्या क्रमांकावर आहे. आपल्या आगामी दबंग 3 आणि या सिनेमांच्या घोषणेनंतर सलमान खान चौथ्या स्थानावर आहे.

लोकप्रिय अभिनेत्रींच्या लिस्टमध्ये अनुष्का शर्मा तिस-या स्थानावर तर प्रियंका चोप्रा चौथ्या स्थानावर आहे. अनुष्काचे तिचा पती क्रिकेटर विराट कोहलीसोबतचे फोटो तर प्रियंकाचे तिचा पती निक जोनाससोबतचे फोटो सध्या सोशल मिडीया आणि वायरल न्यूजमध्ये खूप गाजत असल्याने दोघीही तिस-या आणि चौथ्या क्रमांकावर आहेत.

स्कोर ट्रेंड्स इंडियाचे सह संस्थापक अश्वनी कौल म्हणतात, “हाऊसफुल-4 चा अक्षयचा लुक, ‘बाला’ गाणे आणि सिनेमाची प्रसिध्दी ह्यामुळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि वायरल पब्लिकेशन्समध्ये अक्षय कुमारच्या लोकप्रियतेत वाढ झाली. भूमी पेडणेकर आणि तापसी पन्नूची फिल्म ‘सांड की आंखं’मधल्या त्यांच्या परफॉर्मन्ससाठी दोघींचेही खूप कौतुक झाले. आणि म्हणूनच दोन्ही प्रतिभावान अभिनेत्रींच्या लोकप्रियतेत वाढ झालेली दिसून येतेय.“

अश्वनी कौल पूढे सांगतात, "आम्ही 14 भारतीय भाषांमधील 600 हून अधिक बातम्यांच्या स्त्रोतातून डेटा गोळा करतो. यामध्ये फेसबुक, ट्विटर, मुद्रित प्रकाशने, सोशल मीडियावरील व्हायरल न्यूज, ब्रॉडकास्ट आणि डिजिटल प्लॅटफॉर्म यांचा समावेश आहे. विविध अत्याधुनिक एल्गोरिदममूळे आम्हाला या प्रचंड प्रमाणातील डेटावर प्रक्रिया करण्यास मदत होते. आणि आम्ही बॉलीवूड सेलिब्रिटींच्या स्कोर आणि रँकिंग पर्यंत पोहोचू शकतो.”

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.