मुंबई - सुखविंदर सिंग आणि ए आर रहमान यांनी गायलेल्या ‘देश मेरे देश’ गाण्याचा नवा व्हिडिओ समोर आला आहे. 2002 मध्ये आलेल्या अजय देवगणच्या ‘द लिजेंड ऑफ भगत सिंग’ चित्रपटातील हे गाणं आहे. लोकांचे मनोबल वाढवणं आणि कोरोना योद्ध्यांमध्ये अभिमानाची भावना निर्माण करणं हे या नव्या गाण्याचं उद्दीष्ट आहे.
या गाण्याचा नवीन व्हिडिओ भारताच्या सर्वोत्कृष्टतेची झलक देतो. सोबतच लोकांना आठवण करून देतो, की देशाने नेहमीच अडचणींवर विजय मिळविला आहे. या गाण्यावर अजय म्हणाला, या कठीण काळात आपण कोण आणि कोठे आहोत याची स्वतःला जाणीव करून देणे गरजेचे आहे. आपण या महान देशाचे नागरिक आहोत, जे केवळ साथीच्या रोगाविरुद्ध लढत नाहीत तर इतर देशांनाही मदत करत आहेत.
भारतीयांनी वेळोवेळी हे सिद्ध केले आहे, की आपण कशाशीही लढा देऊ शकतो, असे अजय देवगणने म्हटलं आहे. टिप्स म्युझिकचे कुमार तोरानी यांनी विश्वास व्यक्त केला, की हे गाणे लोकांमधील देशभक्ती जागृत करेल आणि आपल्यातील राष्ट्रवादाचा भाव वाढवेल.