ETV Bharat / sitara

माझे वडिल, माझे गुरु; वीरु देवगणसाठी अजयनं शेअर केली पोस्ट

अॅक्शन दिग्दर्शक वीरू यांचं यावर्षीच मे महिन्यात निधन झालं. अजयनं आपल्या वडिलांसोबतचा आपला लहानपणीचा ब्लॅक अँड व्हाईट फोटो शेअर केला आहे

वीरु देवगणसाठी अजयनं शेअर केली पोस्ट
author img

By

Published : Sep 5, 2019, 5:53 PM IST

मुंबई - आज शिक्षक दिनानिमित्त प्रत्येकजण आपल्या आयुष्यात काही धडे देऊन गेलेल्या गुरुंना शुभेच्छा देत आहेत. यात कलाकारही मागे नाहीत. अभिनेता अजय देवगणनंही शिक्षक दिनानिमित्त एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट इतर कोणासाठी नसून अजयचे वडिल वीरु देवगण यांच्यासाठी आहे.

हेही वाचा - होय तो सलमानच आहे...पण सातारचा

अॅक्शन दिग्दर्शक वीरू यांचं यावर्षीच मे महिन्यात निधन झालं. अजयनं आपल्या वडिलांसोबतचा आपला लहानपणीचा ब्लॅक अँड व्हाईट फोटो शेअर केला आहे. फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये अजयनं म्हटलं, माझे वडिल, माझे गुरु..त्यांनी मला आयुष्याबद्दलचे अनेक मौल्यवान धडे शिकवले.

वीरू देवगण हे केवळ अजयचेच गुरु नव्हते, तर त्यांनी रोहित शेट्टीसारख्या दिग्दर्शकांनाही अॅक्शनचे धडे दिले होते. चित्रपटसृष्टीतील त्यांचं हे मोलाचं योगदान न विसरण्यासारखं आहे. म्हणूनच आजही ते प्रत्येक बॉलिवूडकराच्या मनात अमर आहेत.

हेही वाचा - ११ वर्षांपासून मुंबईत राहतोय आयुष्मान; मात्र, पहिल्यांदाच घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.