मुंबई - जवाहरलाल नेहरु विद्यापीठात ५ जानेवारीला काही बुरखाधारी गुंड शिरले होते. त्यांनी वसतीगृहातील विद्यार्थ्यांना जबर मारहाण केली होती. यावर देशभर आंदोलन उभे राहिले. दरम्यान दीपिका पदुकोणने जेएनयूमध्ये जाऊन जखमी विद्यार्थ्यांची भेट घेतली होती. मात्र, तिच्या 'छपाक' चित्रपटावर बहिष्कार घालण्याचा प्रयत्न काही उजव्या विचारसरणीच्या लोकांनी केला होता. 'छपाक'सोबत अजय देवगणचा 'तान्हाजी' हा चित्रपटही रिलीज झाला होता. अजयने जेएनयू प्रकरणावर आत्तापर्यंत भाष्य करणे टाळले होते. आज त्याने ट्विट करत आपली भूमिका मांडली.
-
I have always maintained that we should wait for proper facts to emerge.
— Ajay Devgn (@ajaydevgn) January 10, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
I appeal to everyone- let us further the spirit of peace and brotherhood, not derail it either consciously or carelessly #JNUViolence
">I have always maintained that we should wait for proper facts to emerge.
— Ajay Devgn (@ajaydevgn) January 10, 2020
I appeal to everyone- let us further the spirit of peace and brotherhood, not derail it either consciously or carelessly #JNUViolenceI have always maintained that we should wait for proper facts to emerge.
— Ajay Devgn (@ajaydevgn) January 10, 2020
I appeal to everyone- let us further the spirit of peace and brotherhood, not derail it either consciously or carelessly #JNUViolence
अजयने ट्विटरवर लिहिलंय, ''योग्य पुरावे येण्याची प्रतिक्षा केली पाहिजे हे मी नेहमी पाळत आलोय. जाणून बुजून बेफिकीरपणे पुढे न जाता सर्वांनी शांततेने बंधुभाव जपत पुढे जावे, असे आवाहन मी करतो आहे.''
अजयने हे आवाहन अत्यंत संयमाने केले आहे. कोणत्याही वादग्रस्त मुद्द्याला हात न घालता त्याने आपले मत मांडलंय.
अजयच्या या ट्विटवर भरपूर प्रतिक्रिया येत आहेत. त्याचा 'तान्हाजी: द अनसंग वॉरियर' हा चित्रपट शुक्रवारी रिलीज झाला. चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. यात अजय मराठा सुभेदार तानाजी मालुसरेंचे व्यक्तीरेखा साकारत आहे. काजोल आणि सैफ अली खान यांच्याही यात प्रमुख भूमिका आहेत.