अॅक्शन हिरो म्हणून ओळख असलेला अजय देवगणचा आज वाढदिवस. ५० वर्षाच्या अजयने गेली तीन दशके प्रेक्षकांच्यावर राज्य केले आहे. १९९१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘फूल और कांटे’ या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले. या पहिल्या चित्रपटातील अभिनयाबद्दल त्याला पदार्पणातील सर्वोकृष्ट अभिनेता म्हणून फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
अजयचा बिनधास्तपणा प्रेक्षकांना भावला. तत्कालिन अॅक्शन कोरिओग्राफर वीरु देवगण यांच्याकडून घरातूनच मिळालेल्या अॅक्शनचा वारसा त्याला आपली प्रतिमा निर्माण करण्यात फायदेशीर ठरला. गंगाजल असो की सिंघम त्याच्या एन्ट्रीलाच प्रेक्षक सरसावून बसतात. त्याची इमेज जरी अॅक्शन हिरोची असली तरी आजवर तब्बल १४० चित्रपटातून विविध भूमिका साकारल्या आहेत.
गोलमाल, धमाल चित्रपटाची सिरीज आणि बोलबच्चन सारख्या चित्रपटातून त्याने प्रेक्षकांना खळखळून हसवले. त्याच्या करियरचा ग्राफ नेहमी चढता राहिला आहे. येत्या १७ मे रोजी त्याचा दे दे प्यार दे हा चित्रपट रिलीज होतोय. आगामी काळात त्याने प्रेक्षकांचे असेच रंजन करीत रहावे याच त्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.