ETV Bharat / sitara

रिया चक्रवर्ती म्हणते, ''अतिव दुःखाचा सामना केल्यानंतर लढण्याची शक्ती मिळते'' - रिया चक्रवर्तीचा आगामी सिनेमा

सुशांत सिंह राजपूतच्या पहिल्या पूर्ण्यतिथीच्या पार्श्वभूमीवर रिया चक्रवर्ती हिने इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले आहे की ''अतिव दुःखाचा सामना केल्यानंतर लढण्याची शक्ती मिळते...यावर विश्वास ठेवा...यावर ठाम रहा'' असे रियाने आपल्या पोस्टमध्ये इन्स्टाग्रामवर लिहिले आहे. तिने #rheality हा हॅशटॅगही वापरलाय आणि लिहिलंय, हेच वास्तव आहे.

Rhea
रिया चक्रवर्ती
author img

By

Published : May 28, 2021, 5:43 PM IST

मंबई - बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्ती गेल्या काही काळापासून चाहते आणि हितचिंतकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे. गेल्या काही महिन्यांत या अभिनेत्रीने काही पोस्टही शेअर केल्या आहेत आणि चाहत्यांना माहिती दिली आहे की ती वैयक्तिक आयुष्यात काय करत आहे?

कोरोनाच्या संकटाच्या काळात देशातील परिस्थिती पाहून रियाने पोस्टमध्ये लिहिले की लोक एकजूटीने उभे आहेत हे पाहून तिला आनंद झालाय. लोक एकमेकांचे आधार होत आहेत. आता गुरुवारी रियाने आणखी एक पोस्ट लिहिली आहे, या कठीण काळात आपल्या सर्वांना एकत्र उभे राहावे लागेल असे अभिनेत्री रियाने म्हटले आहे.

रिया चक्रवर्ती यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे, ''अतिव दुःखाचा सामना केल्यानंतर लढण्याची शक्ती मिळते...यावर विश्वास ठेवा...यावर ठाम रहा''

असे रियाने इंस्टाग्रामवर लिहिले आहे. तसेच, तिने #rheality हा हॅशटॅगही वापरलाय. अनुष्का दांडेकर, आपारशक्ति खुराना, डायना पांडे यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी रियाच्या या पोस्टवर प्रतिक्रिया दिल्या आहेत आणि रियाला पाठिंबा दर्शविला आहे.

रियाच्या या पोस्टवर चाहत्यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे आणि लिहिले आहे की आम्ही सर्वजण तुझ्यावर प्रेम करतो आणि आम्ही तुझ्या पाठीशी उभे आहोत. दुसर्‍या चाहत्याने लिहिले, "हो आम्ही तुझ्या पाठीशी आहोत, इथेच उभे राहूत."

रिया चक्रवर्तीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर ती लवकरच अमिताभ बच्चन आणि इमरान हाश्मी यांच्या भूमिका असलेल्या 'चेहरे' या चित्रपटामध्ये दिसणार आहे. मात्र, रिया चित्रपटाच्या प्रमोशनचा भाग असणार की नाही याबाबत अद्याप निर्मात्यांनी कोणतेही विधान केलेले नाही.

सुशांत सिंह राजपूत १४ जून २०२० रोजी वांद्रे येथील त्याच्या घरी मृत अवस्थेत सापडला होता. त्यानंतर रिया आणि त्याचा भाऊ शौविक यांच्यासह कुटुंबातील सदस्यांची नावे वादात सापडली होती. रिया काही काळ तुरूंगातही राहिली. आता ती एक सामान्य जीवन जगत आहे. मुंबईत अनेकदा जिमच्या बाहेर ती आढळून आली आहे.

हेही वाचा - सलमान खान मानहानी प्रकरणात केआरकेने दिले कोर्टाला आश्वासन

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.