ETV Bharat / sitara

बॉलिवूड पदार्पणापूर्वीच शनाया कपूरने खरेदी केली ८० लाखाची आलिशान कार - बेधडक शनाया कपूर

संजय कपूर आणि महीप कपूर यांची मुलगी शनाया कपूर लवकरच 'बेधडक' या चित्रपटातून बॉलिवूड पदार्पण करणार आहे. त्याआधी तिने 80 लाख रुपयांची आलिशान कार खरेदी केली आहे.

शनाया कपूरची आलिशान कार
शनाया कपूरची आलिशान कार
author img

By

Published : Mar 23, 2022, 12:05 PM IST

Updated : Mar 23, 2022, 12:56 PM IST

मुंबई - महत्त्वाकांक्षी अभिनेत्री शनाया कपूरने तिच्या पदार्पणाच्या चित्रपटाचे शूटिंग सुरू होण्यापूर्वीच एक नवीन कार खरेदी केली आहे. अभिनेता संजय कपूर आणि डिझायनर महीप कपूर यांची मुलगी शनाया, आता ऑडी Q7 ची मालकीण बनली आहे. या कारची किंमत 80 लाख रुपये आहे. स्टाईल स्टेटमेंटसाठी ओळखली जाणारी ही स्टारकिड करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शन निर्मित आगामी चित्रपटातून बॉलिवूडमध्ये प्रवेश करणार आहे.

शनाया कपूरची आलिशान कार
संजय कपूर , महीप कपूर, आणि शनाया कपूर

करण जोहर याची निर्मिती असलेल्या 'बेधडक' चित्रपटातून शनाया बॉलिवूडमध्ये प्रवेश करण्यासाठी सज्ज झाली आहे. चित्रपट अद्याप फ्लेअरवर शुटिंगसाठी जाणे बाकी आहे पण त्याआधी शनायाने एक नवीन लक्झरी कार घरी खरेदी केली आहे. ऑडी मुंबई वेस्टच्या इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोमध्ये शनायाने रविवारी कार खरेदी केली असल्याचे दिसते. आपल्या नव्या कारसोबत शनाया उभी असल्याचे पोटोत दिसते. या खरेदीच्यावेळी तिचे आई वडीलही तिच्यासोबत उपस्थितीत होते.

शनाया कपूरची आलिशान कार
शनाया कपूरची आलिशान कार

शनाया कपूर 'बेधडक' नावाच्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे. हा चित्रपट करण जोहरने प्रस्तुत केला आहे आणि शशांक खेतान दिग्दर्शित आहे. 'बेधडक' चित्रपटातून शनाया व्यतिरिक्त लक्ष्य आणि गुरफतेह पिरजादा या अभिनेत्यांनाही करण जोहर लाँच करत आहे. हा चित्रपट रोम-कॉम स्पेसमधील लव्ह ट्रँगल चित्रपट म्हणून ओळखला जातो. शनाया गेल्या वर्षभरापासून पदार्पणासाठी तयारी करत आहे.

हेही वाचा - आलिया रणबीर 'ब्रह्मास्त्र'च्या शुटिंगसाठी वाराणसीत दाखल, शूटमधील व्हिडिओ लीक

Last Updated : Mar 23, 2022, 12:56 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.