ETV Bharat / sitara

vikcy weds katrina : कॅटरिनाचा 'दीर' सनी कौशलने लिहिली 'वहिनी'साठी ग्रँड वेलकम नोट - Katrina's Vicky wedding

कौशल कुटुंबातील सर्वात मोठी सून बनलेल्या कॅटरिना कैफचे आता घरात जोरदार स्वागत होत आहे. अभिनेता विकीचा भाऊ आणि कॅटरिनाचा दीर, सनी कौशलने विवाहाचा आनंद व्यक्त केला आहे. त्याने वहिनीच्या स्वागतासाठी एक पत्र लिहिले आहे.

सनी कौशलने लिहिली 'वहिनी'साठी ग्रँड वेलकम नोट

author img

By

Published : Dec 10, 2021, 4:37 PM IST

मुंबई - बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कॅटरिना कैफ आता कौशल कुटुंबाची सून बनली आहे. अभिनेत्री कॅटरिनाने 9 डिसेंबर रोजी बॉयफ्रेंड आणि चित्रपट अभिनेता विकी कौशलसोबत लग्नगाठ बांधली. आता घरची नवी नवरी आणि मोठी सून कॅटरिना कैफचे कौशल कुटुंबात खुलेआम स्वागत केले जात आहे. अभिनेता विकीचा भाऊ आणि कॅटरिनाचा दीर, सनी कौशलने विवाहाचा आनंद व्यक्त केला आहे. त्याने वहिनीच्या स्वागतासाठी सोशल मीडियावर एक ग्रँड वेलकम नोट लिहिली आहे.

सनीने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर कॅटरिनासाठी लिहिले आहे, 'आज माझ्या हृदयात आणखी एक जागा बनली आहे. परजाईजी, कुटुंबात आपले स्वागत आहे, या सुंदर जोडप्याला आयुष्यभर भरपूर प्रेम आणि आनंद मिळो.'

सनी कौशल नुकताच प्रदर्शित झालेल्या 'शिद्दत' चित्रपटात दिसला होता. या चित्रपटात त्याची अभिनेत्री राधिका मदनसोबत जोडी दिसली होती. प्रसिद्ध गायिका नेहा कक्करसोबत 'तारों के शहर में' या गाण्यात मुख्य अभिनेता म्हणून दिसल्याने सनी अधिक लोकप्रिय झाला. नेहा कक्कर आणि सनी कौशल स्टारर हे गाणे सुपरहिट ठरले होते, जे आजही त्यांच्या चाहत्यांच्या ओठावर आहे.

कॅटरिना आणि विकीचा विवाह

जवळपास तीन वर्षे चर्चेत असलेल्या कॅटरिना आणि विकीने लग्नाच्या शेवटच्या क्षणापर्यंतही आपले नाते सार्वजनिक केले नव्हते, पण लग्नाच्या एक आठवडा अगोदरच त्यांच्या लग्नाच्या बातमीने बॉलीवूड शहरात खळबळ उडाली होती.

राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील प्रसिद्ध सिक्स सेन्स फोर्ट बरवारा येथे एकमेकांच्या गळ्यात वरमाला घालून हे जोडपे कायमचे एक झाले. घरी लग्नाचे काही विधी पूर्ण करून कॅटरिना-विकी लवकरच चित्रपटाच्या प्रोजेक्टमध्ये काम सुरु करणार आहेत.

हेही वाचा - Vicky Weds Katrina : हिऱ्या सोन्याने जडवलेल्या लेहेंग्यात कॅटरिना कैफ बनली नववधू, घातली 'इतक्या' लाखाची अंगठी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.