ETV Bharat / sitara

Movie Delhi Files : 'द काश्मीर फाइल्स' नंतर विवेक अग्निहोत्री बनवणार 'दिल्ली फाईल्स' चित्रपट

author img

By

Published : Mar 26, 2022, 1:54 PM IST

'द काश्मीर फाइल्स' हा चित्रपटाने दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीचे तारेही चमकले आहेत. काश्मीर फाइल्सने बॉक्स ऑफिसवर आजवर २११ कोटींची रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. आता विवेक लवकरच दिल्ली दंगलीवर चित्रपट बनवणार आहे.

विवेक अग्निहोत्री
विवेक अग्निहोत्री

मुंबई - 'द काश्मीर फाइल्स' हा चित्रपट सध्या खूप चर्चेत असल्यामुळे या चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीचे तारेही चमकले आहेत. काश्मीर फाइल्सने बॉक्स ऑफिसवर आजवर २११ कोटींची रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. हा चित्रपट मुस्लीमविरोधी असून समाजात फूट पाडण्याचे काम करत असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. पण वाद आणि विवेक अग्निहोत्रीचे नाते खूप जुने आहे. याआधी 'ताश्कंद फाईल्स'वरूनही बराच गदारोळ झाला होता. आता विवेक लवकरच दिल्ली दंगलीवर चित्रपट बनवणार आहे.

मीडियाशी बोलताना विवेक अग्निहोत्री म्हणाले की आम्ही सध्या 'द दिल्ली फाइल्स' हा चित्रपट बनवत आहोत. दिल्लीत झालेल्या दंगलीवर आधारित हा चित्रपट असणार आहे. तसेच वेब सिरीज बाबत बोलताना अग्निहोत्रींनी सांगितले होते की काश्मीर फाईल्स बनवताना त्यांनी केलेले संशोधन सामुग्री इतकी आहे की त्यावर वेब सिरीज बनू शकते. यासाठी काही चांगल्या माणसांची गरज आहे जी हे सर्व एकत्र बांधू शकतील. हे खूप मनोरंजक असेल परंतु कोणीतरी यासाठी वित्तपुरवठा करावा लागेल. हा आपला इतिहास आणि वारसा आहे आणि कोणत्याही मोठ्या प्रॉडक्शन हाऊसने तो उचलला पाहिजे.

चित्रपटाबाबत लोकांमध्ये ध्रुवीकरण आणि मतभेद वाढत असल्याच्या आरोपावर चित्रपटाचे दिग्दर्शक म्हणाले की, मला वाटते की ही लोकशाहीसाठी मोठी समाजसेवा आहे, कारण तुम्ही वाईट आणि चांगल्या लोकांचे ध्रुवीकरण करत आहात. ते म्हणाले की मी येथे ध्रुवीकरण हा शब्द वापरणार नाही. मी म्हणेन की या चित्रपटाद्वारे मानवतेचे समर्थन करणारे, मानवी हक्कांचे समर्थन करणारे आणि दहशतवादाचा व्यवसाय करणारे यांच्यात फरक केला गेला आहे.

'द काश्मीर फाइल्स' चित्रपटाने रिलीजच्या दुसऱ्या आठवड्यात 200 कोटी क्लबमध्ये प्रवेश केला आहे. या आठवड्याच्या मध्यभागी चित्रपटाच्या कमाईमध्ये थोडीशी घट झाली होती. अक्षय कुमारच्या बच्चन पांडे रिलीजनंतर या चित्रपटाच्या कमाईत घसरण जाणवू लागली. आता आरआरआर रिलीजनेही काश्मीर फाईल्सच्या कमाईत घट आणली आहे.

हेही वाचा - Rrr In Ap : आंध्रातील प्रेक्षकांचा नादखुळा : सिनेमा थिएटरमध्ये लोखंडी खिळे आणि काटेरी कुंपण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.