मुंबई - तेलुगू हार्टथ्रॉब विजय देवेराकोंडा हिंदी चित्रपटसृष्टीत लायगर या चित्रपटातून झळकणार आहे. या पदार्पणाच्या चित्रपटाचे प्रॉडक्शन अद्याप पूर्ण झालेले नसताना त्याने आणखी एक हिंदी चित्रपट साईन केलाय तोही कॅटरिना कैफसोबत.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
सध्याच्या ट्रेंडनुसार विजय देवराकोंडा हा प्रादेशिक सिनेमाच्या अव्वल सुपरस्टार्सपैकी एक आहे जो पॅन-इंडिया प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी नवीन फॉर्म्युल्यासह तयार आहे. पूर्वी एकाच भाषेत चित्रपट बनायचा आणि तो इतर भाषेमध्ये डब केला जायचा परंतु आता चित्रपट बहुभाषामध्ये बनत आहेत.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
दरम्यान, पुरी जगन्नाथ दिग्दर्शित आणि करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनच्या वतीने लायगर हा पॅन-इंडिया चित्रपट बनत आहे. या चित्रपटानंतर विजय देवराकोंडा अखिल भारतीय स्टार मटेरियल म्हणून प्रदर्शित होईल.
हेही वाचा - ‘इंडियाज बेस्ट डान्सर’ सीझन-२ साठी डिजिटल ऑडिशन्स सुरू