ETV Bharat / sitara

अक्षयनंतर टायगरनंही स्वीकारलं बोटल कॅप चॅलेंज, तेही डोळ्यांवर पट्टी बांधून - viral video

अक्षयपेक्षाही टायगरचा व्हिडिओ अधिक खास आहे. याच कारण म्हणजे टायगरने डोळ्यांवर पट्टी बांधून किकने बाटलीचे बूच अचूक उडवतो आणि बाटली जागेवरच स्थिर राहते.

अक्षयनंतर टायगरनंही स्वीकारलं बोटल कॅप चॅलेंज
author img

By

Published : Jul 4, 2019, 7:30 PM IST

मुंबई - अक्षय कुमारनंतर आता आपल्या जबरदस्त अॅक्शनसाठी ओळखल्या जाणाऱ्या टायगर श्रॉफ 'बोटल कॅप चॅलेंज' स्वीकारलं आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच गाजताना दिसत आहे. या व्हिडिओतून पुन्हा एकदा टायगरचं अॅक्शन स्कील पाहायला मिळत आहे.

अक्षयपेक्षाही टायगरचा व्हिडिओ अधिक खास आहे. याच कारण म्हणजे टायगरने डोळ्यांवर पट्टी बांधून किकने बाटलीचे बूच अचूक उडवतो आणि बाटली जागेवरच स्थिर राहते. निश्चितच टायगरचा हा अनोखा स्टंट त्याच्या चाहत्यांच्या विशेष पसंतीस उतरत आहे.

दरम्यान, टायगरशिवाय अभिनेता कुणाल केमूनेही बोटल कॅप चॅलेंज स्वीकारलं आहे. मात्र, त्याने किकने बूच उडवण्याऐवजी तो हाताने ते उघडून पाणी पिताना दिसत आहे. दरम्यान टायगर श्रॉफच्या चित्रपटांविषयी बोलायचं झाल्यास नुकतंच तो स्टूडंट ऑफ द ईअर २ मधून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. यानंतर आता तो बागी ३ आणि रॅम्बो चित्रपटांमध्ये झळकणार आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.