ETV Bharat / sitara

अजय देवगणनंतर अक्षय कुमारनेही नाकारला सुहेलदेव? - लिजेंड ऑफ सुहेलदेव' कादंबरी

बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमारने अश्विन वर्दे यांचा आगामी पिरीयड ड्रामा चित्रपट 'सुहेलदेव' नाकारला आहे. यापूर्वी अजय देवगण यानेही हा चित्रपट कोणतेही कारण न देता या चित्रपटात रस नसल्याचे म्हटले होते.

Akshay Kumar
अक्षय कुमार
author img

By

Published : Dec 26, 2020, 4:03 PM IST

मुंबई - 'पृथ्वीराज' हा ऐतिहासिक चित्रपटात अभिनेता अक्षय कुमार काम करीत आहे. त्याला 'सुहेलदेव'ची ऑफर देण्यात आली होती. परंतु आमिष त्रिपाठी यांच्या ''लिजेंड ऑफ सुहेलदेव' या कादंबरीवर आधारित 'सुहेलदेव' हा चित्रपट अक्षयने नाकारला आहे.

अक्षयचा 'सुहेलदेव'ला नकार

तारखांची अडचण आणि क्रिएटिव्ह मतभेदांमुळे श्रावस्ती नगराचा राजा असलेल्या सुहेलदेवच्या जीवनावर आधारित 'सुहेलदेव' हा चित्रपट करणार नसल्याचे अक्षयने सांगितल्याचे एका वेबलॉइडने म्हटले आहे.

'सुहेलदेव' चित्रपटात मुख्य भूमिका अक्षयने साकारावी असे दिग्दर्शक अश्विन वर्दे यांना वाटत होते. यासाठी अश्विन यांनी दिल्लीला जाऊन अक्षयची भेट घेऊन कथा ऐकवली. कथन ऐकल्यानंतर अक्षयला असे वाटले की हा चित्रपट भव्य प्रमाणात केला जाईल, तरीही पटकथा पुन्हा तयार करण्याची गरज आहे. क्रिएटिव्ह मतभेदांव्यतिरिक्त, अक्षयच्या तारखा हादेखील मुख्य मुद्दा आहे. कारण पुढील दोन वर्षांसाठी अक्षयने अनेक चित्रपट साईन केले आहेत.

कोण होते सुहेलदेव?

आमिष त्रिपाठीच्या 'लिजेंड ऑफ सुहेलदेव' या पुस्तकात, योद्धा-नायक सुहेलदेव यांच्या नेतृत्वाखाली सर्व धर्म, जाती आणि प्रांतांमध्ये भारतीयांची एकजूट केली आणि परकीय आक्रमणकर्त्यांविरूद्ध तीव्र प्रतिकार केला. सुहेलदेवांचे महाकाव्य असलेल्या या पुस्तकात साहसी आणि प्रेरणादायक कथा सापडतात.

अक्षय कुमारचे आगामी चित्रपट

दरम्यान, अक्षयच्या निर्मितीच्या विविध टप्प्यावर अनेक चित्रपट आहेत. अक्षय सध्या 'पृथ्वीराज' आणि 'अतरंगी रे' या चित्रपटांचे शुटिंग करीत आहे. तर 'सुर्यवंशी' आणि 'बेल बॉटम' हे दोन चित्रपट रिलीज होण्यास तयार आहेत. त्याच्याकडे 'रक्षाबंधन', 'राम सेतू', फरहाद सामजीची अ‍ॅक्शन-कॉमेडी 'बच्चन पांडे' आणि प्रियदर्शनचा एक कॉमिक थ्रिलर देखील आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.