मुंबई - सध्या बॉलिवूडमध्ये दाक्षिणात्य चित्रपटांची चलती आहे. अनेक साऊथच्या चित्रपटांचा हिंदीत रिमेक बनतोय तसेच दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार्स आणि अनेक कलाकार बॉलिवूडमध्ये पदार्पण करताना दिसत आहेत. ‘बाहुबली’ च्या अभूतपूर्व यशानंतर हिंदी व साऊथ चित्रपटसृष्टींमधील दरी बुजताना दिसतेय. कन्नड व तेलगू चित्रपटांतून अपूर्व यश मिळविणारी अभिनेत्री रश्मीका मंदना आता बॉलिवूड पदार्पण करतेय ‘मिशन मजनू’ मधून अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रासोबत. ती तेथील सर्वाधिक मानधन मिळविणारी अभिनेत्री आहे असे म्हटले जाते व तिला ‘कर्नाटक क्रश’ म्हणूनसुद्धा संबोधिले जाते.
अभिनेत्री रश्मीका मंदना चा ‘मिशन मजनू’ आहे सिद्धार्थ मल्होत्रा! अलीकडेच, रश्मीका मंदना, सिद्धार्थ मल्होत्रा बरोबर असलेल्या तिच्या आगामी ‘मिशन मजनू’ या बॉलिवूड चित्रपटाच्या तयारीसाठी मुंबईला पोहोचली. शूटिंगच्या अगोदर ती चित्रपटाच्या ‘वर्कशॉप’ मध्ये भाग घेणार आहे. या चित्रपटाबरोबरच रश्मीकाने, एका मोठ्या बॅनरचा, अजून एक चित्रपट साईन केलाय अशीसुद्धा खबर आहे. तिच्याकडे अनेक बॉलिवूड चित्रपटांसाठी विचारणा होत असून ती काही संहितांचं वाचनही करतेय असे कळत आहे.
अभिनेत्री रश्मीका मंदना चा ‘मिशन मजनू’ आहे सिद्धार्थ मल्होत्रा! ‘मिशन मजनू' हा रश्मिकाचा बॉलिवूडमधील पदर्पणीय सिनेमा असेल. सूत्रांनुसार, ‘रश्मीकाने आधीच दोन बॉलिवूड चित्रपटांना होकार कळविला होता. त्यापैकी एकाची अनाउन्समेंट झाली असून दुसऱ्या चित्रपटाबाबत मौन बाळगण्यात आले आहे. ती काही स्क्रिप्ट्स सुद्धा वाचते आहे.’
अभिनेत्री रश्मीका मंदना चा ‘मिशन मजनू’ आहे सिद्धार्थ मल्होत्रा! ‘सारीलेरू नीकेववारू', 'डियर कॉम्रेड' आणि 'गीता गोविंदम' सारख्या चित्रपटांनी या अभिनेत्रीने साउथ फिल्म इंडस्ट्रीत कोट्यावधी लोकांची मने जिंकली आहेत. रश्मीका मंदना चा प्रवास ‘कर्नाटक क्रश’ ते 'नॅशनल क्रश' होत असून तिला तसा ‘टॅग’ ही मिळाला आहे. रश्मीकाची बॉलिवूड एन्ट्री धमाकेदार होणार यात शंकाच नाही.