ETV Bharat / sitara

अभिनेत्री पूनम पांडेच्या पतीला 3 दिवसांची पोलीस कोठडी - Poonam Pandey

अभिनेत्री पूनम पांडे हिचा पती सॅम अहमद बॉम्बे याला काल संध्याकाळी वांद्रे पोलिसांनी अटक केली होती. त्याला न्यायालयाने 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Actress Poonam Pandey's husband remanded in police custody for 3 days
अभिनेत्री पूनम पांडेच्या पतीला 3 दिवसांची पोलीस कोठडी
author img

By

Published : Nov 9, 2021, 12:59 AM IST

Updated : Nov 9, 2021, 4:39 PM IST

मुंबई - अभिनेत्री पूनम पांडे हिने पोलिसात पतीविरोधात प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल केला आहे. त्यावरून तिचा पती सॅम अहमद बॉम्बे याला काल संध्याकाळी वांद्रे पोलिसांनी अटक केली होती. पूनमला तिच्या पतीने मारहाण केली केली यात ती जखमी झाली होती त्यामुळे तिला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सॅमला आज न्यायालयात हजर केले होते, यावेळी त्याला ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

चर्चेदरम्यान केली होती मारहाण -

मुंबई पोलीस अधिकाऱ्याने माहितीनुसार, अभिनेत्री पूनम पांडेच्या तक्रारीवरून पती सॅम अहमद बॉम्बे याला अटक करण्यात आली आहे, अभिनेत्रीने आरोप केला आहे की पती सॅम त्याची पहिली पत्नी अलविरा हिच्याशी बोलत होता. या चर्चेदरम्यान दोघांमध्ये वादावादी झाली. रागाच्या भरात पतीने भिंतीवर डोके आपटले आणि तिच्यावर जोरदार वार करून तिला जखमी केले. अभिनेत्रीच्या डोक्याला, डोळ्यावर आणि चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली आहे, वांद्रे पोलिसांनी 326 सह विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे, मात्र पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. आज आरोपी सॅमला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

याआधीही घेतली होती पोलिसांची मदत

पूनमला पोलिसांची मदत घेण्याची ही पहिलीच वेळ नाही. त्यांच्या लग्नानंतर दोनच दिवसांनी, पूनमने दक्षिण गोव्यातील कानाकोना पोलीस ठाण्यात पतीविरुध्द एफआयआर दाखल केला होता. यात दोघांत झालेल्या वैयक्तिक वादातून तिला धमकी दिली होती. आणि प्राणघातक हल्ला करून थप्पड मारली होती, असे एफआयआरमध्ये म्हटले होते. गोव्यात हनीमूनसाठी गेले असताना ही घटना घडली होती.

हेही वाचा - नवाब मलिकांनी अंडरवर्ल्डशी संबंध असलेल्या व्यक्तींकडून जमीन विकत घेतली; देवेंद्र फडणवीसांचा आरोप

Last Updated : Nov 9, 2021, 4:39 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.