मुंबई - अभिनेता टायगर श्रॉफ तसा भलताच टॅलेंटेड आहे, याचा पुन्हा एकदा प्रेक्षकांना प्रत्यय येणार आहे. आतापर्यंत आपल्या ऍक्शन आणि डान्सने मंत्रमुग्ध करणारा टायगर, आता प्रेक्षकांसमोर आपला एक नवा पैलू उलगडणार आहे. लवकरच तो नवे गाणे 'अनबिलिव्हेबल' सोबत गायक म्हणून प्रेक्षकांसमोर येत आहे.
या गाण्याचे मोशन पोस्टर आज प्रदर्शित करण्यात आले आहे, यात त्याने सर्वानाच सुखद आश्चर्याचा धक्का दिला आहे. याची घोषणा करताना, टायगरने सोशल मीडियावर लिहिले, 'मला कायमच मी स्वतः गायलेल्या एखाद्या गाण्यावर डान्स करण्याची फार इच्छा होती. या लॉकडाऊनच्या काळात बराच विचार करून आणि बरच डोकं लावून मी काहीतरी तयार केलं, जे खरच 'अनबिलिव्हेबल' होतं. तेच लवकरच एका गाण्याच्या रूपाने तुमच्यासमोर मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न आता करतो आहे.'
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
आज रिलीज करण्यात आलेल्या खास मोशन पोस्टरमध्ये टायगर हातात माईक घेऊन उभा आहे आणि आकर्षक पार्श्वसंगीत सुरू आहे. बिग बैंग म्युझिकच्या सहकार्याने, टायगरने हा ट्रॅक सादर केला आहे. हे गाणं डी जी मायने आणि अवितेश यांनी लिहिलं असून टायगरने स्वतः ते गायलं आहे. दिग्दर्शक पुनीत मल्होत्राने या गाण्याचे दिग्दर्शन केले असून परेशने कोरियोग्राफी केली आहे.
'अनबिलिव्हेबल' बिग बैंग म्युझिकद्वारे निर्मित आहे ज्यात टायगर पहिल्यांदाच स्वतः बांधलेल्या चालीवरच्या गाण्यावर नाचताना आणि गाताना दिसणार आहे. या गाण्याच पहिलं पोस्टर आता आपल्या भेटीला आलं असून लवकरच त्यांचं टीजर देखील रिलीज होईल. आता टायगरची ही सिंगरपन्ती त्याच्या फॅन्सना कितपत आवडते ते पहायचं.