ETV Bharat / sitara

राजेश खन्नाच्या जन्मदिनानिमित्य नरेंद्र राठींनी सांगितल्या आठवणी

बॉलिवूडचे आघाडीचे अभिनेता राजेश खन्ना यांचा आज जन्मदिन आहे. राजेश खन्ना हे अशा अभिनेत्यांपैकी एक होते ज्यांचे खूप चाहते होते. ते प्रत्येक सामान्य माणसाला भेटायचे. त्यांच्या जन्मदिनानिमित्त जाणून घ्या त्यांच्या स्वभावाविषयी...

अभिनेता राजेश खन्ना
अभिनेता राजेश खन्ना
author img

By

Published : Dec 29, 2021, 3:21 PM IST

नवी दिल्ली/गाझियाबाद - ७० आणि ८० च्या दशकात बॉलिवूडमधील सुपरस्टार अभिनेता राजेश खन्ना यांचा आज जन्मदिन आहे. त्यांचे चाहते आजही त्यांची आठवण ठेवतात. राजेश खन्ना यांच्या निकटवर्तीय असलेल्या गाझियाबाद काँग्रेस नेत्याने राजेश खन्ना यांच्यासोबतचा एक जुना फोटो शेअर करून एक अतिशय मनोरंजक किस्सा शेअर केला आहे. गोष्ट जुनी आहे पण किस्सा ऐकल्यावर समजेल की काका फक्त रील लाईफ मध्येच नाही तर खऱ्या आयुष्यातही मोठे सुपरस्टार होते.

कांग्रेसचे प्रांतीय सचिव नरेंद्र राठी

गाझियाबादमध्ये राहणारे काँग्रेस नेते नरेंद्र राठी यांची दिल्लीतील राजेश खन्ना यांच्या निवासस्थानी नेहमी भेट होत असे. ते म्हणाले की आज त्यांचा जन्मदिन आहे. असे लोक खूप विरळ असतात, माझ्यासारख्या लहान व्यक्तीला ते मित्र मानत असत, हा त्यांचा मोठेपणा होता आणि माझे भाग्य होते. एकदा तर मी त्यांना म्हणालो काका, अनेक मोठ्या कंपन्यांना तुमची जाहिरात हवी आहे. चांगले पैसे द्यायलाही ते तयार आहेत, तुम्ही ते करा. त्यावर ते म्हणाले जो वर्षानुवर्षे एव्हरेस्टच्या शिखरावर राहिला आहे त्याला त्याला छोट्या मोठ्या टेकड्या आवडत नाहीत. असे म्हणत त्यांनी जाहिरातींना नम्रपणे नकार दिला.

कांग्रेस नेत्यासोबत राजेश खन्ना
कांग्रेस नेत्यासोबत राजेश खन्ना

काँग्रेस नेते नरेंद्र राठी यांनी सांगितले की, एकदा राजेश खन्ना यांच्या दिल्लीतील निवासस्थानी काही मजूर दुरुस्तीचे काम करत होते. त्यांनी आपल्या सहाय्यकाला बोलावून सांगितले की, या मजुरांना पंचतारांकित हॉटेल असलेल्या विक्रम हॉटेलमध्ये घेऊन जा, त्यांना जेवायला घालून परत आणा. सहाय्यक घाबरला, कारण त्या मजूरांचे कपडे पंचतारांकित हॉटेलच्या योग्यतेचे नव्हते.

नरेंद्र राठी पुढे म्हणाले की मी कसेतरी प्रकरण हाताळले आणि काकांना म्हणालो, त्यांना त्या हॉटेलचे जेवण आवडणार नाही आणि त्या मजुरांनीही माझ्या म्हणण्याशी सहमती दर्शवली. मग त्याला चांगल्या ढाब्यावर जेवण दिले. नरेंद्र राठी यांनी त्यांच्या जुन्या आठवणींचा एक फोटोही सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये तो राजेश खन्नासोबत ते दिसत आहेत.

हेही वाचा - Rrr Pre Release : राजामौलीमुळे ज्यु. एनटीआरच्या रुपाने भाऊ मिळाला राम चरण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.