मुंबई - कोणत्याही व्यक्तीला आपला लुक चांगला असावा अशी इच्छा असते. आपल्या सौंदर्यात भर पाडण्यासाठी डोक्यावरचे केस फार महत्वाची भूमिका पार पाडतात. मात्र, काही लोकांना केस गळण्याची समस्या असते. तर, काहींच्या डोक्यावर केसच उगवत नाहीत. मग, केस उगवण्यासाठी ते काही ना काही आटापीटा करत असतात. ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांच्याही डोक्यावरचे केस बऱ्याच वर्षांपासून गायब आहेत. त्यामुळे आता त्यांनी जगभरातील टक्कल असणाऱ्यांसाठी एक गाणं गायलं आहे. त्यांनी ट्विटरवर त्यांच्या गाण्याचा व्हिडिओ पोस्ट केला आहे.
टक्कल असणाऱ्या व्यक्तींच्या आयुष्यात काय समस्या येतात, हे काहीदिवसांपूर्वीच 'बाला' आणि 'उजडा चमन' यांसारख्या चित्रपटातून पडद्यावर दाखवण्यात आले आहे. मात्र, अनुपम खेर यांनी एका गाण्याच्या माध्यमातून आपले दु:ख व्यक्त केलं आहे.
-
दुनिया भर के गंजो को समर्पित मेरा ये भावपूर्ण गाना। My emotional song dedicated to all the Baldies in the world. 🤣😂🤓😎 #MondayMotivation pic.twitter.com/Ih2nXqfFV4
— Anupam Kher (@AnupamPKher) March 2, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">दुनिया भर के गंजो को समर्पित मेरा ये भावपूर्ण गाना। My emotional song dedicated to all the Baldies in the world. 🤣😂🤓😎 #MondayMotivation pic.twitter.com/Ih2nXqfFV4
— Anupam Kher (@AnupamPKher) March 2, 2020दुनिया भर के गंजो को समर्पित मेरा ये भावपूर्ण गाना। My emotional song dedicated to all the Baldies in the world. 🤣😂🤓😎 #MondayMotivation pic.twitter.com/Ih2nXqfFV4
— Anupam Kher (@AnupamPKher) March 2, 2020
हेही वाचा -क्रितीच्या आयुष्यात खुललं प्रेम?, 'या' फोटोची होतेय चर्चा
अनुपम खेर हे सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय आहेत. आपल्या काही पोस्टने ते प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत असतात. त्यांनी 'ऐ मेरे प्यारे वतन' या देशभक्तीपर गाण्याच्या चालीवर टक्कल असणाऱ्या व्यक्तींसाठी एक खास गाणे तयार केले आहे. या गाण्याच्या चालीत त्यांनी स्वत:चे शब्द रचले आहेत. त्यांचा हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही.
त्यांच्या या व्हिडिओवर भाजपचे राहुल कोठारी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'आपके अनुपम व्यंग्य के चक्कर में अब गंजों की खेर नहीं', असे कॅप्शन त्यांनी या व्हिडिओवर दिले आहे.
-
आपके 'अनुपम' व्यंग्य के चक्कर में अब गंजों की 'खेर' नहीं
— Rahul Kothari Bjp (@RahulKothariBJP) March 2, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">आपके 'अनुपम' व्यंग्य के चक्कर में अब गंजों की 'खेर' नहीं
— Rahul Kothari Bjp (@RahulKothariBJP) March 2, 2020आपके 'अनुपम' व्यंग्य के चक्कर में अब गंजों की 'खेर' नहीं
— Rahul Kothari Bjp (@RahulKothariBJP) March 2, 2020
हेही वाचा -फोटोग्राफर्सनी 'वहिनी' म्हणताच जेनेलियाच्या चेहऱ्यावर खुलले हसू, पाहा व्हिडिओ