गेल्या वर्षीच्या कर्दनकाळातून सिनेसृष्टी उभारी घेत असताना आता पुन्हा कोवीड-१९ च्या रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. ही सर्वांसाठीच चांगली बातमी नाहीये. परंतु गोष्टी नॉर्मल होत असताना सिनेमासंदर्भातील अनेक गोष्टींचे नियोजन करण्यात आले होते. काही दिवसांपूर्वीच श्री कृपा प्रॅाडक्शन निर्मित 'बाबू' या चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित करण्यात आले होते त्यामुळे ‘बाबू’ बद्दलची उत्सुकता वाढली होती. त्या अनुषंगाने ‘बाबू’ चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी नारळ वाढविण्यात आला आणि ‘बाबू’ कोण यावरही प्रकाश टाकण्यात आला. यावेळी या सिनेमातील ‘बाबू’ च्या लूकचे नवीन पोस्टरदेखील प्रदर्शित करण्यात आले.
हिंदी मालिकांमधील अभिनेता अंकित मोहन साकारणार मराठी 'बाबू'! - बाबू चित्रपटात मुख्य भूमिकेत अंकित मोहन
हिंदी मनोरंजनसृष्टीत आघाडीवर असलेला हँडसम आणि डॅशिंग अभिनेता अंकित मोहन 'बाबू' या सिनेमात मुख्य भूमिका साकारणार आहे. त्याने यापूर्वी ‘फतेहशिकस्त’ सारख्या ऐतिहासिक मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे. शिवाय अंकित हा हिंदी मालिकांमधील लोकप्रिय अभिनेता आहे.