मुंबई - दिग्दर्शक अभिषेक कपूरने 'काय पो छे' आणि 'केदारनाथ' यासारख्या चित्रपटातून सुशांतसिंह राजपूतसोबत काम केले आहे. सुशांतचे असे अचानक निघून जाणे सर्वांच्या मनाला चटका लावणारे आहे. अभिषेक यांनी सांगितले की केदारनाथच्या रिलीजनंतर तो हरवलेल्या अवस्थेत असायचा. केदारनाथच्यावेळी त्याची खूप काळजी वाटत होती. कारण त्यावेळी त्याच्याबद्दल मीडियामध्ये खूप काही लिहून आले होते. सिनेमाच्या रिलीजनंतर ज्या प्रकारे सारा अली खानला प्रेक्षकांचे प्रेम मिळत होते तसे सुशांतला मिळत नव्हते.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
अभिषेकने सुशांतबद्दल बोलताना सांगितले, ''मी गेली दीड वर्षे त्याच्याशी बोललो नाही. त्याने पन्नासवेळा आपला नंबर बदलला असेल. मला आठवतं जेव्हा केदारनाथ रिलीज झाला होता तेव्हा मीडियाने त्याच्यावर निशाणा साधला होता. काही झाले होते मला माहिती नाही. सुशांत स्पष्ट पाहात होता की त्याला जास्त प्रेम मिळत नाही. सर्वजण साराचे कौतुक करीत होते. तो माझ्याशीही बोलत नव्हता. तो हरवल्यासारखा राहायचा. मी त्याला दुसऱ्यांदा मेसेज केला, हा त्याला मी केलेला शेवटचा मेसेज होता.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
हेही वाचा - सलमानचे 'बिइंग ह्यूमन' म्हणजे फक्त देखावा - अभिनव कश्यप
सुशांतबद्दल बोलताना त्यांनी पुढे सांगितले, मी त्याला मेसेज केला की भाई तुला संपर्क करण्याचा प्रयत्न करतोय. मला माहिती नाही तू उदास आहेस, व्यग्र आहेस की आणखी काय. पण माझ्याशी बोलायला फोन कर. आपण दुसऱ्यांदा एक शानदार सिनेमा बनवलाय. याचा आनंद आपण साजरा करायचा नाही तर कोणी करायचा. त्यानंतर मी त्याला शेवटचा मेसेज जानेवारीत केला. त्याने वाढदिवसालाही मला उत्तर दिले नाही. परंतु तुम्ही लाईन क्रॉस करु शकत. परंतु तुम्ही जास्त गोष्टी करायला जाल, जास्त सल्ला द्यायला जाल तर आपले महत्त्व गमावून बसाल.
सुशांतसिंह राजपूतने १४ जानेवारील वांद्र्यातील आपल्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. अद्याप त्याच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही. गेल्या काही महिन्यात तो डिप्रेशनमध्ये होता असे सांगितले जात आहे.
हेही वाचा - सुशांतच्या १५ वर्षाच्या फॅनने केली पोर्ट ब्लेयरमध्ये आत्महत्या