अभिषेक बच्चन आणि यामी गौतम यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘दसवी’ या सामाजिक विनोदी चित्रपटाचे चित्रीकरण आग्र्यात सुरु होते. काही दिवसांपूर्वीच यामी गौतमने तिचे ‘पॅक अप’ झाल्याचे समाज माध्यमांवर घोषित केले होते. आता अभिषेक बच्चननेही त्याचे या चित्रपटातील आग्र्यातील काम संपल्याचे जाहीर केले. कोरोना संकटाच्या काळात ‘दसवी’चे चित्रीकरण पूर्ण केले हे महत्वाचे. अभिषेक या चित्रपटात शालेय शिक्षण पूर्ण न झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेत दिसणार आहे.
यामी गौतम आणि अभिषेक बच्चन दिनेश विजनची निर्मिती असलेल्या सोशल कॉमेडी फिल्म 'दसवी' च्या आग्र्यातील शूटिंगचे वेळापत्रक संपले आहे. चित्रपटाचे दुसरे शेड्युल सुरू करण्यासाठी अभिषेक आणि संपूर्ण टीम थेट लखनऊला जाणार आहेत. या चित्रपटात यामी गौतम आणि निमरत कौर देखील आहेत. तुषार जलोटा दिग्दर्शित या चित्रपटाचे लेखन रितेश शाह, सुरेश नायर आणि संदीप लेझेल यांनी केले आहे.
यामी गौतमने तिचे ‘पॅक अप’ दिनेश विजन, संदीप लेझेल आणि शोभना यादव निर्मित तसेच जिओ स्टुडिओज व दिनेश विजान प्रस्तुत ‘दसवी’ हा येत्या नोव्हेंबर मध्ये प्रदर्शित होणार आहे. ‘दसवी’ बेक माय केक चित्रपटांच्या सहकार्याने मॅडॉक फिल्म्स प्रॉडक्शन ची प्रस्तुती आहे.
हेही वाचा - अमिताभ आणि रश्मिका मंदानाच्या 'गुडबाय' चित्रपटाच्या शुटिंगला सुरुवात