ETV Bharat / sitara

असा सिनेमा ज्यानं सगळं काही बदलून टाकलं, धूम चित्रपटासाठी अभिषेकची पोस्ट - ईशा देओल

नुकतंच या सिनेमाला १५ वर्ष पूर्ण झाली असून अभिषेकनं यानिमित्तानं एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यानं म्हटलं, १५ वर्षापासून माझ्या हृदयाची स्पंदन असलेला. एक असा चित्रपट ज्यानं सगळं काही बदलून टाकलं, विशेषतः माझ्यासाठी.

धूम चित्रपटासाठी अभिषेकची पोस्ट
author img

By

Published : Aug 28, 2019, 9:01 PM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चननं रेफ्यूजी चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं. २००० साली प्रदर्शित झालेल्या त्याच्या या पहिल्याच सिनेमाला अपयश आलं. मात्र, यानंतर २००४ साली आलेला धूम चित्रपट अभिषेकच्या फिल्मी करिअरमधील टर्निंग पॉईंट ठरला.

नुकतंच या सिनेमाला १५ वर्ष पूर्ण झाली असून अभिषेकनं यानिमित्तानं एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यानं म्हटलं, १५ वर्षापासून माझ्या हृदयाची स्पंदन असलेला. एक असा चित्रपट ज्यानं सगळं काही बदलून टाकलं, विशेषतः माझ्यासाठी. या सिनेमासाठी मी आदित्य चोप्रा आणि संजय गाध्वी यांचे जितके आभार मानेल, ते कमीच आहेत.

पुढे तो म्हणाला, माझ्या करिअरच्या अशा वळणावर त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवत मला पाठिंबा दिला, जेव्हा मला त्याची सर्वात जास्त गरज होती. चित्रपटाची स्टारकास्ट जॉन अब्राहम, उदय चोप्रा, ईशा देओल आणि रिमी यांच्यासोबतच्या चित्रीकरणाच्या अनेक आठवणी आहेत. या आठवणी आयुष्यभरासाठी राहतील आणि ती मैत्री आजपर्यंत कायम आहे.

Intro:Body:

news 

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.