ETV Bharat / sitara

अभिषेक बच्चनला आहे ऐश्वर्या रायसोबत स्क्रिन स्पेस शेअर करण्याची इच्छा - अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या

अभिषेक बच्चन आपला ४५ वा वाढदिवस आज साजरा करीत आहे. त्याला आगामी काळात ऐश्वर्या रायसोबत रुपेरी पडद्यावर एकत्र काम करण्याची मनापासून इच्छा आहे.

Abhishek Bachchan and Aishwarya
अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या
author img

By

Published : Feb 5, 2021, 2:27 PM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन आपल्या पत्नी ऐश्वर्या राय बच्चन सोबत व्यावसायिक पुनर्मिलन होण्यासाठी संधीची आतुरतेने वाट पाहतोय.

अभिषेक आणि ऐश्वर्या यांनी ढाई अक्षर प्रेम के (२०००), कुछ ना कहो (२००३), बंटी और बबली (२००५), उमराव जान (२००५), धूम 2 (२००६) गुरू (२००७) आणि रावण (२०१०) या सारख्या चित्रपटात एकत्र काम दोघांनी एकत्र काम केले होते. गेली १० वर्षे त्यांनी पडद्यावर स्क्रिन स्पेस शेअर केलेली नाही.

या जोडप्याने अनुराग कश्यपच्या 'गुलाब जामुन'मध्ये स्क्रीन स्पेस शेअर करणे अपेक्षित होते पण चित्रपटाचे शुटिंग कधीच सुरू झाले नाही. अभिषेकला मात्र ऐश्वर्याबरोबरच्या ऑनस्क्रीन पुनर्मिलनाची आशा आहे. नुकत्याच वेब अ‍ॅलॉइडला दिलेल्या मुलाखतीत अभिषेकने म्हटले आहे की तो पुन्हा ऐश्वर्यासोबत काम करण्याची प्रतीक्षा करीत आहे.

"लवकरच, मी आशा करतो. तिच्याबरोबर काम करण्यास मला खरोखर आनंद वाटतो. आम्ही पुन्हा एकदा एक्तर काम करावी अशी मागणी करणारे चाहत्यांचे असंख्य इमेल्स आम्हाला मिळत असतात. आम्ही पुन्हा एकत्र काम केल्यास खूप आनंद होईल," असे अभिषेक म्हणाला.

अनुराग बसूच्या लुडो या चित्रपटात अखेरीस दिसलेला अभिषेक अन्नपूर्णा घोष दिग्दर्शित बॉब बिस्वास या चित्रपटात झळकणार आहे. हर्षद मेहताच्या जीवनावर आधारित ‘द बिग बुल’ हा त्याच्या आगामी ओटीटी रिलीज आहे.

हेही वाचा - 'शेतकरी आंदोलनाबाबत योग्य तो निर्णय व्हावा'

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.