मुंबई- २०१८ मध्ये 'मनमर्जिया' चित्रपटात अभिषेक बच्चनने काम केले होते. त्यानंतर तो रुपेरी पडद्यापासून लांब होता. यावेळी तो शाहरुख खानसोबत काम करीत आहे. गुरूवारी अभिषेकने कोलकात्यात 'बॉब विश्वास'च्या शूटींगला सुरूवात केली.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
शूटींगच्या पहिल्या दिवसाबद्दल अभिषेकने इन्स्टाग्रामवर माहिती दिली आहे. त्याने चित्रपटाबद्दलचा खुलासाही केलाय. फोटोच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिलंय, "नोमोश्कार, 'बॉब विश्वास' डे वन"
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
अभिषेकने हा फोटो शेअर केल्यानंतर त्याला बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
'बॉब विश्वास'चे दिग्दर्शन नवोदित दीया घोष करणार आहे. याची कथा सुजॉय घोष यानी लिहिलिय. या चित्रपटाची निर्मि शाहरुख खान करीत आहे.