मुंबई - आमिर खानने आपल्या सोशल मीडियावरुन सांगितले आहे, की त्याच्या काही सहकाऱ्यांनी कोविड-१९ चे सकारात्मक परिक्षण केले आहे. त्याने आपल्या ट्विटर हँडलवरुन हे सांगताना बीएमसीचे आभार मानले आहेत.
या घटनेनंतर ते पूर्णपणे क्वारंटाईन झाले आहेत. तो आपल्या आईचीही कोरोना टेस्ट करणार आहे. मुंबईमध्ये दररोज मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
हेही वाचा - सुशांतच्या कुटुंबियांनी मानले चाहत्यांचे आभार, त्याच्या अनोख्या गुणांचा केला खुलासा
कामाच्या पातळीवर आमिर खान आगामी 'लाल सिंह चड्ढ़ा' या चित्रपटात काम करत आहे. यामध्ये करिना कपूरसोबत त्याची भूमिका आहे. काही दिवसापूर्वी एक बातमी आली होती की या चित्रपटात कोरोना महामारीची परिस्थितीही दाखवली जाणार आहे.