ETV Bharat / sitara

किरण राव आणि मुलगा आझादसह लंच डेटवर दिसला आमिर खान - आमिर किरण लंच डेट

आमिर खान आणि किरण राव त्यांचा नऊ वर्षांचा मुलगा आझादसह मुंबईतील एका रेस्टॉरंटमध्ये दिसले. या तिघांना गर्दीतून सुरक्षितरित्या बाहेर जाताना हौशी फोटोग्राफर्सनी आपल्या कॅमेऱ्यात टिपले.

आझादसह लंच डेटवर दिसला आमिर खान
आझादसह लंच डेटवर दिसला आमिर खान
author img

By

Published : Sep 27, 2021, 4:39 PM IST

मुंबई - बॉलिवूडचा सुपरस्टार आमिर खान आणि किरण राव यांनी घटस्फोट घेतलेला असला आहे. दोघांनी ठरवल्या प्रमाणे मुलाच्या बाबतीत ते काळजी घेताना दिसतात. लाल सिंह चड्ढा आणि इतर प्रोजेक्ट्सवर आमिरसोबत किरण एकत्र काम करीत आहे. काही दिवसापूर्वी आमिर किरणसोबत लंच डेटवर भेटला होता. आता तो मुलगा आझादसोबत आढळून आला.

आमिर, किरण आणि आझाद कॅमेऱ्यात कैद

रविवारी आमिर, किरण आणि त्यांचा नऊ वर्षांचा मुलगा आझाद मुंबईतील एका रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना दिसले. या तिघांना गर्दीतून सुरक्षितरित्या बाहेर जाताना हौशी फोटोग्राफर्सनी आपल्या कॅमेऱ्यात टिपले.

मुलगा आझादचे पालक म्हणून दोघे घेताहेत काळजी

गेल्या महिन्याच्या सुरुवातीला, किरणला मुंबई विमानतळावर स्पॉट करण्यात आले होते. ती लाल सिंह चड्ढा चित्रपटाच्या शुटिंगमधून लडाखहून परतली होती. त्यावेळी तिचे आमिर आणि आझादने स्वागत केले होते.

15 वर्षांपेक्षा जास्त काळ एकत्र सुखी संसारल केल्यानंतर या वर्षी जुलै महिन्यात विभक्त होण्याचा निर्णय घेतला. आझाद या त्यांच्या मुलाचे पालक म्हणून दोघेही जबाबदारीने संगोपन करणार असल्याचेही त्यांनी सांगितले होते. चित्रपट निर्मिती, पानी फाऊंडेशन आणि इतर उपक्रमात ते एकत्र काम करणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले होते.

लगानच्या सेटवर झाली मैत्री

आशुतोषच्या 'लगान' या चित्रपटात काम करताना किरण ही असिस्टंट डायरेक्टर होती. तेव्हा त्यांची ओळख झाली. आमिरचा त्याच्या पत्नीशी घटस्फोट झाल्यावर आमिर-किरणची मैत्री वाढली. पुढे मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यांनी दीड वर्ष एकत्र राहित्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. एका मुलाखतीत आमिरने किरणशिवाय माझे जीवन व्यर्थच आहे, असेही सांगितले होते.

हेही वाचा - 'टायगर 3' च्या ऑस्ट्रियातील शुटिंगमधून सलमान खान मायदेशी परतला

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.