मुंबई - अमिताभ बच्चन यांची भूमिका असलेला 'झुंड' हा चित्रपट शुक्रवारी (४ मार्च) चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या कथानकामुळे अगोदरच भरपूर प्रशंसा झाली आहे. ‘झुंड’ या चित्रपटाचे दिग्दर्शन नागराज मंजुळे यांनी केले आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान चित्रपटाशी संबंधित एक मोठी गोष्ट समोर आली आहे. या चित्रपटासाठी अमिताभ बच्चन यांचे नाव आमिर खानने सुचवले होते.
इंडिया टुडेमधील एका बातमीनुसार, 'झुंड' अभिनेता अमिताभ बच्चन यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, आमिर खानने त्यांना 'झुंड' चित्रपटासाठी राजी केले होते. अमिताभ बच्चन म्हणाले, 'मला आठवतं, जेव्हा मी आमिरशी संभाषण केलं होतं, तेव्हा त्याने मला हा चित्रपट करायला हवा असं सांगितलं होतं आणि जेव्हा आमिर एखाद्या गोष्टीला होकार देतो तेव्हा काय होतं ते तुम्हाला माहिती आहे'.
रिपोर्टनुसार, जेव्हा आमिर खानने 'झुंड' चित्रपटाची स्क्रिप्ट ऐकली, तेव्हा तो ते पाहून खूप प्रभावित झाला आणि त्यानंतर त्याने या चित्रपटासाठी अमिताभ बच्चन यांचे नाव सुचवले. एवढेच नाही तर खुद्द आमिरने अमिताभ बच्चन यांनाही हा चित्रपट करण्याची विनंती केली होती. नागराज मंजुळ आणि अमिताभ बच्चन मिळून हा चित्रपट योग्य प्रकारे सादर करू शकतील, असा आमीर खानला विश्वास होता.
आमिर खानने नुकताच 'झुंड' चित्रपट पाहिला तेव्हा त्याचे अश्रू थांबण्याचे नाव घेत नव्हते. हा चित्रपट पाहून आमिर खूप प्रभावित झाला आणि त्याने अमिताभ बच्चनपासून चित्रपटाचे दिग्दर्शक नागराज मंजुळेपर्यंतच्या संपूर्ण टीमचे कौतुक केले होते.
हेही वाचा - रिंकू राजगुरूचा 'झुंड'मधील लूक आणि पारंपरिक साडीतील सुंदर फोटो