ETV Bharat / sitara

आमिर खानने 'पानिपत' टीमला दिल्या यशासाठी सदिच्छा - Ashutosh Govarikar latest news

आशुतोष गोवारीकरच्या पानिपत चित्रपटाला चांगले यश मिळावे, यासाठी आमिर खानने शुभेच्छा दिल्या आहेत. सोशल मीडियावरून त्याने शुभेच्छा दिल्या. त्याचा आगामी 'लाल सिंह चड्ढा' चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.

Aamir Khan give wishesh to Panipat team
आमिर खानने 'पानीपत' टीमला दिल्या यशासाठी सदिच्छा
author img

By

Published : Dec 4, 2019, 8:18 PM IST

मुंबई - आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित पानिपत चित्रपटाचे प्रदर्शन ६ डिसेंबरला होत आहे. अर्जुन कपूर, कृति सेनॉन, संजय दत्त यांच्या भूमिका असलेल्या 'पानिपत' चित्रपटाला मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानने शुभेच्छा दिल्या आहेत.

आमिरने आपल्या इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहिली असून तो लिहितो, 'प्रिय आशू, संजू, अर्जुन, कृति तुम्हा सर्वांना पानिपतसाठी ऑल द बेस्ट. चित्रपट जितका चांगला आहे तितके किंबहुना त्याहून अधिक यश मिळू दे. लव्ह यू.''

आमिर खान आणि आशुतोष गोवारीकर यांनी लगान या गाजलेल्या चित्रपटात एकत्र काम केले होते. जगभर या चित्रपटाला चांगले यश मिळाले होते. तसेच अनेक पुरस्कारांचा वर्षावही झाला होता. आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित पानिपत या सिनेमात अर्जुन कपूर, कृती सेनॉन, संजय दत्त, झीनत अमान, पद्मिनी कोल्हापुरे, मोहनिश बेहेल यांच्या मुख्य भूमिका आहेत.

आमिर खान आणि करिना कपूर खान यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या आगामी 'लाल सिंह चड्ढा' चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. यात आमिर खान सरदारच्या गेटअपमध्ये दिसत आहे.

Intro:Body:

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.