मुंबई - आमिर खानच्या चाहत्यांसाठी एक खूशखबर आहे. तो लवकरच पडद्यावर झळकण्यासाठी सज्ज होत आहे. गुलशन कुमार यांच्या बायोपिकमध्ये मुख्य भूमिका करण्याचा त्याने पक्का निर्धार केला आहे.
-
IT'S OFFICIAL... Aamir Khan reverses his decision... Decides to work with director Subhash Kapoor in #Mogul... The Gulshan Kumar biopic will star Aamir in central role.
— taran adarsh (@taran_adarsh) September 9, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">IT'S OFFICIAL... Aamir Khan reverses his decision... Decides to work with director Subhash Kapoor in #Mogul... The Gulshan Kumar biopic will star Aamir in central role.
— taran adarsh (@taran_adarsh) September 9, 2019IT'S OFFICIAL... Aamir Khan reverses his decision... Decides to work with director Subhash Kapoor in #Mogul... The Gulshan Kumar biopic will star Aamir in central role.
— taran adarsh (@taran_adarsh) September 9, 2019
सिनेसमिक्षक आणि ट्रेड अॅनलिस्ट तरण आदर्श यांनी ही बातमी ट्विटरवर दिली आहे. त्यांनी लिहिलंय, "हे अधिकृत आहे...आमिर खानने आपला निर्णय बदला आहे. सुभाष कपूर यांच्यासोबत 'मोगल'मध्ये काम करण्याचा निर्णय त्याने घेतला आहे. गुलशन कुमार यांच्या बायोपिकमध्ये आमिर खान मध्यवर्ती भूमिकेत असेल."
सुभाष कपूर यांच्यावर महिलेचे शोषण केल्याचा आरोप लावण्यात आला होता. मीटू मोहिमेचा फटका त्यांना बसला होता. त्यानंतर आमिरने त्यांच्यासोबत काम न करण्याचा निर्णय घेतला होता.