अहमदाबाद - चित्रपट अभिनेता सोनू सूद अलिकडेच त्याच्या घरावर आणि कार्यालयावर प्राप्तीकर विभागाने छापा टाकल्यामुळे चर्चेत आहे. सोनू सूद यांनी बुधवारी येथील हॉटेलमध्ये आम आदमी पक्षाच्या काही नेत्यांसोबत बैठक केली. यावेळी गुजरातचे प्रसिद्ध उद्योजकही या बैठकीला उपस्थित होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनू सूद लवकरच आम आदमी पार्टीमध्ये सामील होऊ शकतो.
या घटनाक्रमात अभिनेता सोनू सूदने आम आदमी पक्षाच्या काही नेत्यांची सिंधू भवन रोडवरील एका खासगी हॉटेलमध्ये भेट घेतली. असे मानले जाते की काही दिवसांपूर्वी सोनू सूदने दिल्लीत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली होती, त्यानंतरच त्याच्या घरी आयकर छापे टाकण्यात आले होते.
दरम्यान, अभिनेता सूदने आपल्या एका मुलाखतीत म्हटले होते की, त्याला दोन पक्षांनी राज्यसभेची जागा देऊ केली होती, परंतु त्याने ही ऑफर नाकारली होती.
आपल्या माहिती करीता सांगायचे तर गुजरातमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांमध्ये आम आदमी पक्षही रिंगणात उतरणार आहे. अशा स्थितीत जर सोनू सूद आम आदमी पक्षात सामील झाला तर नजीकच्या भविष्यात गुजरातच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
हेही वाचा - साडी नेसलेल्या महिलेस रेस्टॉरंटमध्ये प्रवेश नाकारल्याने भडकली रिचा चढ्ढा