मुंबई - पैठणी म्हणजे साडय़ांची राणी. पैठणी आवडत नाही अशी एकही महिला निदान महाराष्ट्रात तरी सापडणार नाही. खरंतर ही साडी मिळविण्यासाठीचा खेळ झी मराठीवर गेली कित्येक वर्षे अविरत सुरु आहे. यातील पैठणी मिळविण्यासाठी अनेक ‘वहिनी’ अटीतटीचा सामना करीत असतात. महाराष्ट्राचे ‘भाओजी’ आदेश बांदेकर हे ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खुमासदार पद्धतीने करीत असतात. नुकतेच आदेश बांदेकर यांनी महाराष्ट्राची खास ओळख असलेली ‘पैठणी’ बॉलिवूडची सुपरस्टार कतरीना कैफला भेट दिली आहे.
झी मराठी पुरस्कार सोहळा -
कतरीना कैफने दिग्दर्शक रोहित शेट्टी सोबत झी मराठी पुरस्कार सोहळ्याला खास हजेरी लावली होती. महाराष्ट्राचं महावस्त्र 'पैठणी' देऊन आदेश बांदेकर यांनी 'होम-मिनिस्टर' या कार्यक्रमाद्वारे गेली 17 वर्ष तमाम वहिनींचा सत्कार व सन्मान केला आहे. पण यावेळी झी मराठी अवॉर्ड्स 2021 मध्ये बांदेकरांनी कतरीना कैफचा पैठणी देऊन सन्मान केला.
कतरीनाचे स्वागत अगदी मराठमोळ्या पद्धतीत -
कतरीनाच्या सौंदर्याने फक्त भारतच नाही. तर संपूर्ण जगभरातील चाहत्यांना भुरळ पडली आहे. नुकत्याच संपन्न झालेल्या झी मराठी पुरस्कार सोहळ्यात कतरीना कैफ आणि रोहित शेट्टी यांनी त्यांच्या आगामी ‘सूर्यवंशी’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हजेरी लावली. यावेळी बादेंकरांनी कतरीनाचे स्वागत अगदी मराठमोळ्या पद्धतीत म्हणजेच महाराष्ट्राचे महावस्त्र भेट देऊन केलं. इतका मोठा सन्मान दिल्याने त्या क्षणी कतरीना भारावून गेली. तिच्या चेहऱ्यावरील आनंदचं सगळं काही सांगून गेला.
5 नोव्हेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार
येत्या 5 नोव्हेंबरला ‘सूर्यवंशी’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. नुकतंच या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाकडून ग्रीन सिग्नल मिळाला आहे. सीईओ रविंद्र भाकड यांनी कोणतीही कात्री न लावता U/A सर्टिफिकेट दिले आहे. हा चित्रपट 145 मिनिटांचा आहे. या चित्रपटामध्ये अक्षय कुमारसोबत अजय देवगण आणि रणवीर सिंग मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. त्याचसोबत बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
हेही वाचा - 'टायगर 3'ची टीम ऑस्ट्रियात दाखल, कॅटरिनाने शेअर केला व्हिडिओ