मुंबई - मीरा नायर दिग्दर्शित वेब सीरिज 'ए सुटेबल बॉय'मध्ये रशिद नावाच्या उर्दू शिक्षकाची भूमिका विजय वर्मा करीत आहे. या भूमिकेसाठी विजय यांना आपली भाषा आणि भाव यासाठी खूप मेहनत करावी लागली. विजय म्हणाले, "रशीद हा उर्दू शिक्षक आहे, म्हणून मला शब्द आणि वाक्यांच्या उच्चारांवर अधिक लक्ष द्यावे लागले. मी त्यावर बरेच संशोधन केले, उर्दू ऑडिओ क्लिप ऐकली आणि ज्यांनी माझ्या भाषेवर काम केले होते, त्यांच्याकडून व्यक्तिरेखेत जाण्यासाठी प्रशिक्षण घेतले. उर्दू एक सुंदर आणि पवित्र भाषा आहे. तुम्ही ठीक बोलू शकला नाहीत तर, त्याचा प्रभाव राहात नाही. रशिदची भूमिका कठीण होती. कथा पुढे सरकत असताना याचा खुलासा होत जातो.''
मीरा नायरची ही वेब सीरिज 'ए सुटेबल बॉय' नावाने लिहिलेल्या विक्रम सेठ यांच्या कादंबरीवर आधारित आहे. यात तब्बू, ईशान खट्टर, तन्या माणिकतला, रसिका दुग्गल, जीवन शहा, शहाना गोस्वामी, राम कपूर, विनय पाठक आणि नमित दास मुख्य भूमिकेत आहेत. ही वेब सीरिज २३ ऑक्टोबरपासून नेटफ्लिक्सवर प्रसारित होईल.