ETV Bharat / sitara

VIDEO: अधुऱ्या प्रेमाची मन हेलावणारी कथा, पारोच्या 'देवदास'ला सतरा वर्ष पूर्ण - aishwarya rai

चित्रपटात भव्यदिव्य महाल, व्यक्तिरेखांचा पोशाख, दागदागिने या सर्वांचा एक वेगळाच थाट आपल्याला पाहायला मिळतो. यात शाहरूखने पारो म्हणजेच ऐश्वर्याच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या देवदासची भूमिका साकारली होती

पारोच्या 'देवदास'ला सतरा वर्ष पूर्ण
author img

By

Published : Jul 12, 2019, 4:39 PM IST

मुंबई - शाहरूख खान, माधुरी दीक्षित आणि ऐश्वर्या रायसारखी तगडी स्टारकास्ट आणि संजय लिला भन्साळींचं दिग्दर्शन म्हटल्यावर चित्रपटाला तुफान यश मिळालं असणारं हे नवीन नाही. स्टारकास्ट पाहता आतापर्यंत तुमच्याही हा चित्रपट लक्षात आला असेल. होय, प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलेल्या देवदास चित्रपटाला १७ वर्ष पूर्ण झाली आहेत.

भाग्य आणि प्रेमाची कथा, असं ट्विट करत 'देवदास'मधील एका गाण्याची झलक भन्साळी प्रोडक्शनच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर करण्यात आली आहे. २००२ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या कथोसोबतच चित्रपटातील गाणी कलाकारांचे लूक आणि अभिनयाचीही चांगलीच चर्चा होती.

चित्रपटात भव्यदिव्य महाल, व्यक्तिरेखांचा पोशाख, दागदागिने या सर्वांचा एक वेगळाच थाट आपल्याला पाहायला मिळतो. यात शाहरूखने पारो म्हणजेच ऐश्वर्याच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या देवदासची भूमिका साकारली होती. तर माधुरीने चंद्रमुखी नावाचं पात्र साकारलं होतं. त्यावेळच्या बिग बजेट चित्रपटांच्या यादीत या चित्रपटाचा समावेश होता.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.