ETV Bharat / science-and-technology

China First Death From H3N8 Virus : चीनमध्ये एच३एन८ विषाणूने वाढवले टेन्शन, पहिला बळी, महिलेचा झाला मृत्यू, कोंबड्यांपासून धोका

author img

By

Published : Apr 12, 2023, 3:42 PM IST

जागतिक आरोग्य संघटनेने चीनमध्ये एच३ एन८ प्रकारच्या विषाणूने महिलेचा मृत्यू झाल्याचे बुधवारी जाहीर केले आहे. या महिलेचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली असून यापूर्वी चीनमध्ये या ( H3N8 ) विषाणूमुळे बाधित झाल्याच्या दोन घटना पुढे आल्या होत्या.

China First Death From H3N8 Virus
संग्रहित छायाचित्र

नवी दिल्ली : एव्हीयन इन्फ्लूएंझा ए ( H3N8 ) या विषाणूमुळे चीनमध्ये पहिला मृत्यू झाल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेने बुधवारी दिली आहे. त्यामुळे जगभरात एकच खळबळ उडाली आहे. चीनने 27 मार्चला 56 वर्षीय महिलेला एच३ एन८ H3N8 विषाणूची लागण झाल्याीच माहिती जागतिक आरोग्य संघटनेला दिली होती. ग्वांगडोंग प्रांतातील महिला 22 फेब्रुवारीला या विषाणूमुळे आजारी पडली होती. आजारी महिलेला 3 मार्चला गंभीर न्यूमोनिया झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर 16 मार्चला या महिलेचा मृत्यू झाल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट केले आहे.

बाधित कोंबड्यांच्या संपर्कात आली होती महिला : चीनमधील मृत महिला ही बाधित कोंबड्यांच्या संपर्कात आल्याची माहिती आरोग्य संघटनेच्या वतीने देण्यात आली आहे. आजार सुरू होण्यापूर्वी या महिलेचा पोल्ट्रीच्या संपर्कात येण्याचा इतिहास होता. तिच्या घराभोवती वन्य पक्ष्यांच्या राहण्याचा इतिहास असल्याचेही जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. या घटनेच्या प्राथमिक साथीच्या तपासणीत जीवंत पोल्ट्री मार्केटमध्ये येणे हे संसर्गाचे कारण असू शकते असेही आरोग्य अधिकार्‍यांनी स्पष्ट केले आहे. त्यांना संक्रमित व्यक्तीच्या जवळच्या संपर्कांमध्ये इतर कोणतीही प्रकरणे आढळली नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

एच३एन८ विषाणूचा व्यक्तीकडून नाही होत संसर्ग : एच३एन८ हा विषाणू एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पसरत नसल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे. या विषाणूत व्यक्तीकडून व्यक्तीकडे पसरण्याची क्षमता नाही. त्यामुळे राष्ट्रीय, प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मानवांमध्ये त्याचा प्रसार होण्याचा धोका कमी मानला जातो असेही जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट केले आहे.

कोंबड्यांपासून होतो संसर्ग : इन्फ्लूएंझा विषाणू सतत विकसित होत आहेत. मात्र मानवांमध्ये झुनोटिक इन्फ्लूएंझा संसर्ग लक्षणे नाहीत. एव्हीयन इन्फ्लूएंझा विषाणूंचा संसर्ग सहसा संक्रमित जीवंत किंवा मृत कोंबड्यांपासून होतो. बाधित महिलेच्या निवासस्थानातील नमुने चाचणी H3N8 साठी सकारात्मक असल्याचे यूएन आरोग्य संस्थेने म्हटले आहे. चीनमध्ये 2022 मध्ये हेनान प्रांतातील झुमाडियन शहरात अगोदर या संसर्गाचे रुग्ण आढळले होते. यात चार वर्षांचा मुलगा आणि हुनान प्रांतातील चांगशा शहरातील पाच वर्षाच्या मुलाचा समावेश होता. ही दोन H3N8 प्रकरणांची नोंद झाल्यानंतर आता ही तिसरी घटना आहे.

हेही वाचा - Anti Cancer Ayurvedic Drug : कर्करोगावर आले आयुर्वेदिक औषध, लकरच सुरू होणार चाचण्या

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.