सॅन फ्रान्सिस्को : व्हॉट्स अॅपच्या आपल्या यूझरसाठी एक आनंदाची बातमी घेऊन येत आहे. व्हॉट्स अॅप नवीन २१ इमोजी लवकरच आपल्या यूझरसाठी जारी करणार आहे. त्यातही व्हॉट्स अॅपने ८ इमोजी डिझाइन केल्या आहेत. त्यामुळे व्हॉट्स अॅपच्या यूझरसाठी नवीन इमोजी वापरणे एका वेगळ्या आनंदाची अनुभूती मिळणार आहे.
इमोजीसाठी नवीन की बोर्डची गरज नाही : मेटा मालकीच्या असेल्या व्हॉट्सअॅपने आपल्या अँड्राईड व्हर्जनवर बीटा टेस्टर्ससाठी 21 नवीन इमोजी आणत आहे. वॅबॅट इन्फोने दिलेल्या अहवालानुसार नवीन युनिकोड 15.0 वरून या 21 इमोजी पाठवण्यासाठी वेगळे कीबोर्ड डाउनलोड करून वापरण्याची गरज नाही. आता अधिकृत व्हॉट्स अॅप की बोर्डवरून या इमोजी थेट पाठवल्या जाऊ शकतात. पूर्वी नवीन 21 इमोजी अधिकृत व्हॉट्सअॅप कीबोर्डमध्ये दिसत नव्हत्या. व्हॉट्सअॅपचे की बोर्ड विकसित करण्याची प्रक्रिया सुरू असल्याने त्यावरुन या इमोजी दिसत नव्हत्या. परंतु पर्यायी कीबोर्ड वापरून या इमोजी पाठवणे शक्य होत होते. आता मात्र व्हॉट्स अॅपच्या अधिकृत की बोर्डवरुन या इमोजी पाठवणे शक्य आहे.
व्हॉट्स अॅप करा अपडेट : व्हॉट्स अॅपने नवीन इमोजी सादर केल्यामुळे आता यूझरला त्या वापरता येणे शक्य झाले आहे. अगोदर इमोजी प्राप्त होऊनही त्या पाठवणे यूझरला शक्य होत नव्हते. आता मात्र व्हॉट्स अॅपने त्या इमोजी सादर केल्यामुळे त्या पाठवणे यूझरला शक्य होते. काही वापरकर्ते आता अॅपच्या विविध आवृत्त्यांवर अधिकृत व्हाट्सअॅप की बोर्डवरून नवीन इमोजी पाठवण्यास सुरूवात करू शकतात, असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्यासाठी आपले व्हॉट्स अॅप अपडेट करुन घ्या. आपले व्हॉट्सअॅप अपडेट केल्यानंतर या इमोजी यूझरला वापरता येणार आहेत.
आठ इमोजी केल्या डिझाईन : व्हॉट्स अॅपने आपल्या यूझरसाठी नवीन आठ इमोजी डिझाईन केल्या आहेत. या नवीन इमोजी यूझरला वेगळा आनंद देणाऱ्या असल्याची माहिती कंपनीच्या वतीने देण्यात आली आहे. या इमोजी वापरुन तुम्ही आपल्या प्रिय व्यक्तीला विशिष्ट संदेश देण्यास सक्षम असणार असल्याचेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
गोपनियतेशी तडजोड नाही : मेटाच्या वतीने व्हॉट्स अॅप यूझरसाठी वेगवेगळे फिचर जारी करण्यात येत आहेत. त्यामुळे यूझरला वेगळा आनंद मिळत आहे. आता व्हॉट्सअॅप 'सायलेन्स अननोन कॉलर' नावाचे एक नवीन फीचर विकसित करत असल्याची माहिती मेटाच्या वतीने देण्यात आली आहे. या फिचरमुळे वापरकर्त्यांना अनोळखी नंबरवरून कॉल लिस्ट आणि नोटिफिकेशन म्यूट करता येणार असल्याची माहिती मेटाच्या वतीने देण्यात आली आहे. नवीन फीचर सध्या अँड्रॉइडसाठी व्हॉट्सअॅप बीटावर विकसित होत आहे. व्हॉट्स अॅप आपल्या यूझरसाठी नवनवीन आणि मनोरंजक फीचर्स घेऊन येत आहे. त्यामुळे तुमच्या चॅट्सला गोपनियतेसह अधिक मनोरंजक बनवत आहेत. यापूर्वी व्हॉट्सअॅपने व्हॉईस मेसेज ट्रान्सक्रिप्शन रोल आउट करण्याबाबत माहिती शेअर केली होती. हे फीचर आल्यानंतरही युझर्सच्या गोपनीयतेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचे व्हॉट्स अॅपच्या वतीने स्पष्ट करण्यात आले होते. यूझरकडून ज्या व्हॉइस रेकॉर्डिंग प्राप्त होतात, त्यांच्या डेटावर लॉकर डिव्हाइसवरच प्रक्रिया केली जाईल असेही व्हॉट्स अॅपच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
हेही वाचा - Twitter Breaks : ट्विटरचे एपीआय संभाळण्यास उरला फक्त एक अभियंता, फोटो अपलोड होणे गंडल्याने लाखो यूजरला फटका