ETV Bharat / science-and-technology

WhatsApp calling feature : काय आहे व्हॉट्सअ‍ॅपचे नवीन वैशिष्ट्ये ?

व्हॉट्सअ‍ॅपच्या ऑडियो कॉलमध्ये 7 व्हाट्सएप वापरकर्ते समाविष्ट होऊ शकतात. मेटाने ग्रुप कॉलिंग संख्येत वाढ केली आहे असे अहवालाद्वारे सांगण्यात येत आहे.

WhatsApp calling feature
व्हॉट्सअ‍ॅपचा नवीन वैशिष्ट्ये
author img

By

Published : May 16, 2023, 3:25 PM IST

सॅन फ्रान्सिस्को : मेटा हे लवकरच व्हॉट्सअ‍ॅप मॅकओएस डिव्हाइसवर एक नवीन ग्रुप कॉलिंग सुरू करणार आहे. आधी ऑडियो कॉलमध्ये 7 व्यक्ती समाविष्ट होऊ शकत होते. आता मात्र मेटाने या संख्येत वाढ केली आहे. त्यामुळे आता ऑडियो कॉलमध्ये जास्त लोक समाविष्ट होऊ शकतात. याआधी देखील व्हॉट्सअ‍ॅपमध्ये अनेक बदल करण्यात आले होते. आता पुन्हा युजर्ससाठी हा नवीन बदल करण्यात येणार आहे. या ग्रुप कॉलिंग फीचरमध्ये युजरला व्हॉट्सअ‍ॅपमध्ये थोडा बदल बघण्यास मिळेल.

व्हाट्सएप ग्रुप कॉलिंग फीचर : नवीन आलेल्या अहवालात असे म्हटले आहे की, नवीन फीचरमध्ये सर्व लोकांसह एका ग्रुपला कॉल करण्याची परवानगी मिळेल. जर युजरच्या व्हॉट्सअ‍ॅपला एकही ग्रुप नाही. तर बस कॉल्स उघडा आणि क्रिएट कॉल बटण क्लिक करा. त्यानंतर अ‍ॅपच्या सेक्शनमध्ये एक- एक करून नवीन लोक निवडा त्यानंतर एक ग्रुप कॉल करू शकता. या गृप कॉलचा आनंद युजर घेवू शकतात. रिपोर्टमध्ये हे देखील नमूद करण्यात आले आहे की, युजर या कनेक्शनमध्ये जास्तीत जास्त 7 लोकांना निवडू शकतात. तर ग्रुप ऑडियो कॉलमध्ये जास्तीत जास्त 32 लोक समाविष्ट होऊ शकतात.अहवालानुसार, इतर सर्व सुधारणांसह, ग्रुप कॉलिंग फीचर काही बीटा टेस्टर्ससाठी उपलब्ध आहे. दरम्यान, WhatsApp Android वर ब्रॉडकास्ट चॅनल संभाषणावर काम करत आहे, ज्यामध्ये 12 नवीन वैशिष्ट्यांचा समावेश असणार आहे.

काय असणार नवीन वैशिष्ट्य? : या वैशिष्ट्यांमध्ये संभाषणातील मेसेजिंग इंटरफेस, पडताळणी स्थिती, अनुयायी संख्या, निःशब्द सूचना बटण, हँडल, वास्तविक अनुयायी संख्या, शॉर्टकट, चॅनेल वर्णन, निःशब्द सूचना टॉगल, दृश्यमानता स्थिती, गोपनीयता हे सर्व या अहवालात समाविष्ट करण्यात आले आहे. मेटा कंपनी ही युजर्ससाठी नवीन अपडेट्स आणत असते. यापूर्वी अ‍ॅपच्या वैशिष्ट्यांमध्ये बदल करण्यात आले होता. रिपोर्टनुसार, नवीन फीचर आल्यानंतर सोशल मीडिया ग्रुप्समध्ये सुधारणा केली जाऊ शकते. नवीन मेटा बदलामुळे आता व्हॉट्सअ‍ॅप युजर्सना पूर्वीपेक्षा जास्त फीचर्स मिळणार आहे. तसेच यामुळे व्हाट्सअ‍ॅप कॉलिंगममध्ये सुधारणा ही बघायला मिळणार आहे.

हेही वाचा : Shah Rukh Khan News : शाहरुख खानने पत्नीचे कॉफी टेबल बुक 'माय लाइफ इन डिझाइन'चे केले लाँच

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.