नवी दिल्ली : स्मार्टफोन निर्माता कंपनी विवोने आपला नवीन वाय 56 5जी स्मार्टफोन बाजारात आणला आहे. या फोनमध्ये सुपर नाईट 50 मेगापिक्सलच्या कॅमेऱ्यासह विविध फिचर दिले आहेत. नवीन स्मार्टफोनच्या 8GB + 128GB व्हेरियंटची किंमत 19,999 रुपये असल्याचे कंपनीने जाहीर केले आहे. कंपनीच्या अधिकृत ई-स्टोअर आणि सर्व भागीदार रिटेल स्टोअरमध्ये हा फोन खरेदीसाठी उपलब्ध आहे.
पाच हजार एसएएचची बॅटरी अन् बरेच काही : विवोच्या नवीन वाय 56 5G मध्ये 6.58- इंचाचा फुल्ल एचडी डिस्प्ले आहे. त्यासह 5,000 एमएचए बॅटरी आहे. विवो इंडीयाच्या ब्रँड स्ट्रॅटेजीचे प्रमुख योगेंद्र श्रीरामुला यांनी विवो वाय 56 5G हे Y- श्रेणीतील पहिले 5G डिव्हाइस असल्याचे सांगितले. त्याची किंमत 20,000 च्या सेगमेंटमध्ये असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. विवो वाय 56 आम्ही आणखी मोठ्या ग्राहकांप्रर्यंत पोहोचू इच्छित असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. त्यासह ग्राहकांना नवीनतम तंत्रज्ञानाचा अनुभव घेण्याची संधी देऊ इच्छित असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
विवो वाय 56 मध्ये या आहेत सुविधा : विवो वाय 56 5 जीमध्ये सुरक्षिततेसाठी अनेक फिचर देण्यात आले आहेत. त्या फोनमध्ये झटपट आणि कार्यक्षम अनलॉक करण्यासाठी फेस वेक वैशिष्ट्यासह साइड फिंगरप्रिंट स्कॅनर आहे. त्यासह नवीन डिव्हाइस ड्युअल रियर कॅमेरा सेटअपसह सुसज्ज आहे. विवो वाय 56 5जी 50एमपी मुख्य कॅमेरा आणि 2MP कॅमेरा आहे. त्यासह 16 एमपी फ्रंट कॅमेरा देखील या फोनमध्ये आहे. विवो फोन मीडिया टेक डायमेन्सिटी 700 व्हिरियंटचे आहे. याची 5G चिपसेट 2.2GHz पर्यंत असल्याचेही कंपनीने स्पष्ट केले आहे.
हेही वाचा - Chat GPT powered Bing : मायक्रोसॉफ्ट बिंगच्या एआयसोबत चॅट जीपीटीने चॅटवर घातली बंधने