ETV Bharat / science-and-technology

US Orders Probe Against Tesla : एलॉन मस्क येणार अडचणीत? 'या' प्रकरणी अमेरिकेने दिले चौकशीचे आदेश - टेस्लाच्या सीट बेल्टमध्ये त्रुटी

टेस्ला कारच्या एक्स मॉडेलमध्ये त्रुटी असल्याच्या तक्रारी ग्राहकांनी केल्या होत्या. त्यामुळे अमेरिकेच्या नॅशनल हायवे ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी ॲडमिनिस्ट्रेशनकडून चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

US Orders Probe Against Tesla
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Apr 7, 2023, 1:03 PM IST

सॅन फ्रान्सिस्को : टेस्लाचे संस्थापक एलॉन मस्क अडचणीत येण्याची शक्यता आहे. एक्स मॉडेल कारमध्ये सीट बेल्टमध्ये अनेक त्रुटी असल्याची तक्रारी अनेक ग्राहकांकडून करण्यात आल्या होत्या. त्यामुळे यूएस नॅशनल हायवे ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी ॲडमिनिस्ट्रेशनकडून (NHTSA) टेस्लाची चौकशी सुरू करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. अनेक ग्राहकांनी आपल्या टेस्लाच्या सीट बेल्टमध्ये त्रुटी असल्याच्या तक्रारी यूएस नॅशनल हायवे ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी ॲडमिनिस्ट्रेशनकडे केल्या होत्या.

टेस्लाच्या मॉडेल एक्समध्ये आहेत तक्रारी : टेस्लाने 2022 आणि 2023 मध्ये बनवलेल्या टेस्ला मॉडेल एक्स या कारच्या सीट बेल्टमध्ये अनेक त्रुटी असल्याचे पुढे आले आहे. ही कार चालवताना समोरील सीट बेल्ट अँकर प्रीटेंशनरशी जोडलेला नसल्याची तक्रार काही ग्राहकांनी दिलr होती. त्याबाबतच्या तक्रारीही ऑफिस ऑफ डिफेक्ट इन्व्हेस्टिगेशन (ODI) ला प्राप्त झाल्या होत्या. सीट बेल्टमध्ये त्रुटी असल्याने ग्राहकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

टेस्लाची 50 हजार कारच्या सीट बेल्टमध्ये असू शकतात त्रुटी : टेस्लाने उत्पादित केलेल्या या नवीन कारमध्ये सीट बेल्टमध्ये त्रुटी असल्याच्या अनेक तक्रारी करण्यात आल्याची दखल नॅशनल हायवे ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी ॲडमिनिस्ट्रेशनने घेतली आहे. या कार अपर्याप्तपणे जोडलेल्या अँकर लिंकेजसह वितरित करण्यात आल्याचे नॅशनल हायवे ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी ॲडमिनिस्ट्रेशनने स्पष्टच केले. सीट बेल्टमध्ये त्रुटी असलेल्या 50 हजार टेस्लाच्या कार प्रभावित होऊ शकत असल्याचा दावा नॅशनल हायवे ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी ॲडमिनिस्ट्रेशनने केला आहे.

टेस्लाने अद्याप दिला नाही चौकशीला प्रतिसाद : टेस्लाच्या एक्स मॉडेलच्या सीट बेल्टमध्ये तक्रारी प्राप्त झाल्याने नॅशनल हायवे ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी ॲडमिनिस्ट्रेशनने चौकशीचे आदेश दिले आहेत. मात्र टेस्लाच्या वतीने याबाबत अद्याप कोणताही प्रतिसाद देण्यात आला नाही. प्राप्त झालेल्या तक्रारीत कोणालाही दुखापत झाली नसली, तरी कार कमी मायलेजवर आल्याचा दावा नॅशनल हायवे ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी ॲडमिनिस्ट्रेशनने केला आहे.

टेस्लाने त्रुटीमुळे मागवली वाहने परत : टेस्लाच्या कारमध्ये त्रुटी असल्याने टेस्लाच्या मॉडेल वाय कारबाबत कंपनीची नॅशनल हायवे ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी ॲडमिनिस्ट्रेशनकडून चौकशी करण्यात येत आहे. कार चालवताना स्टीयरिंग व्हील्स धोकादायकपणे घसरल्याच्या घटना समोर आल्याचा दावाही करण्यात येत आहे. त्यातच टेस्लाने सॉफ्टवेअरमधील त्रुटीमुळे 3 लाख 21 हजारपेक्षा अधिक कार परत मागवल्या आहेत. टेस्लाने परत मागवलेल्या कारमध्ये टेस्लाच्या मॉडेल 3 आणि मॉडेल वाय या 2020 ते 2023 दरम्यान उत्पादित कारचा समावेश करण्यात आला आहे.

हेही वाचा - Not Considering Law To Regulate AI : आर्टिफिशियल इंटेलिजन्स रोखण्यासाठी कोणत्याही कायद्याचा विचार नाही, आयटी मंत्रालयाचा खुलासा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.