ETV Bharat / science-and-technology

Twitter Will Label Hateful Tweets : आता ट्विटर द्वेषपूर्ण ट्विट्सना लावणार लेबल, वापरकर्त्यांवर लावणार चाप

ट्विटरवर द्वेश पसरवणाऱ्या ट्विटला यापुढे ट्विटर लेबल लावणार असल्याची माहिती ट्विटरने दिली आहे. ट्विटरने आपले हे धोरण लागू केले असून द्वेशपूर्ण ट्विटजवळ जाहिराती न लावण्याचेही ट्विटरने जाहीर केले आहे.

author img

By

Published : Apr 18, 2023, 2:21 PM IST

Twitter
संग्रहित छायाचित्र

नवी दिल्ली : ट्विटरने आपल्या धोरणांचे उल्लंघन करत असलेल्या ट्विटमध्ये सार्वजनिकपणे लेबल लावण्याची घोषणा केली आहे. यामुळे ट्विटरने द्वेशपूर्ण ट्विट करणाऱ्यांना चाप लावला आहे. ट्विटर आपल्या धोरणांचे उल्लंघन करणार्‍या ट्विट्सना शोधून अशा ट्विटसला प्रतिबंधित करणार असल्याची घोषणा केली आहे. नवीन लेबल द्वेशपूर्ण कृती करणाऱ्यांना चाप लावतील असे ट्विटरने स्पष्ट केले आहे.

ट्विटर लावणार फिल्टर : काही वापरकर्ते ट्विटरचा वापर द्वेश पसरवण्यासाठी करत असल्याचे दिसून येते. त्यामुळे ट्विटरने अशा वापरकर्त्यांना आळा घालण्यासाठी उपाययोजना केली आहे. यात ट्विटरने द्वेश पसरवणाऱ्या ट्विट्सची पोहोच मर्यादित करण्याचा निर्णय घेतला आहे. याला दृश्यमानता फिल्टरिंग असेही म्हटले जाते. ही आमच्या विद्यमान अंमलबजावणी क्रियांपैकी एक असून आम्हाला बायनरी सामग्री मॉडरेशनच्या दृष्टिकोनातून पुढे जाण्यास अनुमती देत असल्याचे ट्विटरने सोमवारी उशिरा आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये नमूद केले आहे.

लेबल लावलेले ट्विट शोधण्यावर मर्यादा : ट्विटरने आपल्या नवीन धोरणानुसार द्वेशपूर्ण ट्विट शोधण्यास कमी दृश्यमान केली आहेत. त्यामुळे एखादा वापरकर्ता असे द्वेशपूर्ण ट्विट शोधण्याचा प्रयत्न करेल, तेव्हा ते सहजासहजी सापडणार नाही. इतर सामाजिक प्लॅटफॉर्मप्रमाणे आम्ही ही कारवाई केल्याचे ट्विटरच्या वतीने याबाबत स्पष्ट करण्यात आले आहे. ऐतिहासिकदृष्ट्या हा निर्णय पारदर्शकपणे कार्य करणार असल्याचेही ट्विटरच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. त्यासह हा निर्णय फक्त ट्विट स्तरावरच लागू करण्यात आला असून त्याचा वापरकर्त्याच्या खात्यावर परिणाम करणार नसल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले आहे.

लेबल लावलेल्या ट्विटच्या शेजारी दिसणार नाहीत जाहिराती : ट्विटरने आपले नवे धोरण जाहीर केल्याने द्वेश पसरवणाऱ्या वापरकर्त्यांना आता चांगलाच आळा घातला जाणार असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे लेबल असलेल्या ट्विटच्या शेजारी कोणतीही जाहिरात लावणार नसल्याचेही ट्विटरने स्पष्ट केले आहे. हे लेबल सुरुवातीला केवळ आमच्या द्वेषपूर्ण ट्विटला आळा घालण्याच्या धोरणाचे उल्लंघन करणाऱ्या ट्वीट्सला लागू होतील. मात्र कंपनी या इतर क्षेत्रांमध्येही हेच धोरण विस्तारित करण्याची योजना आखत असल्याचेही ट्विटरने जाहीर केले आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यात Twitter 2.0 वरील आमचे ध्येय सार्वजनिक संभाषणाचा प्रचार आणि संरक्षण करण्याचे असल्याचेही ट्विटरने जाहीर केले आहे. ट्विटर वापरकर्त्यांना सेन्सॉरशिपची भीती न बाळगता त्यांची मते आणि कल्पना व्यक्त करण्याचा अधिकार असल्याचेही ट्विटरने यावेळी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा - Apple CEO Tim Cook : अ‍ॅपलचे भारतात पहिले रिटेल स्टोअर लाँच; लॉन्चिंग इव्हेंटमध्ये सेलिब्रिटींनी दिली सीईओ टिम कुकसोबत पोझ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.