ETV Bharat / science-and-technology

Twitter Blue : ट्विटर ब्लू टिक वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी!, इलॉन मस्क यांनी केली 'ही' घोषणा

मायक्रो ब्लॉगिंग साइट ट्विटरच्या ब्लू टिक वापरकर्त्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ट्विटरचे सीईओ एलोन मस्क यांनी घोषणा केली आहे की ट्विटर लवकरच त्यांना जाहिरातीतून मिळणारा फायदा ट्विटर ब्लू टिक वापरकर्त्यांसह शेअर करणार आहे.

Twitter Blue
ट्विटर ब्लू
author img

By

Published : Feb 4, 2023, 2:32 PM IST

सॅन फ्रान्सिस्को : ट्विटरचे सीईओ इलॉन मस्क आपल्या युजर्ससाठी प्रत्येकवेळी काहीतरी नवीन आणण्याचा प्रयत्न करतात. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा एक नवीन फिचर आणले आहे. इलॉन मस्क यांनी घोषणा केली की, ट्विटर आता त्यांना त्यांच्या जाहिरातीच्या माध्यमातून मिळणार महसूल ट्विटर ब्लू वापरकर्त्यांसह शेअर करणार आहे.

  • Starting today, Twitter will share ad revenue with creators for ads that appear in their reply threads

    — Elon Musk (@elonmusk) February 3, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

ट्विटर युजर्सच्या प्रतिक्रिया : इलॉन मस्कने शुक्रवारी एका ट्विटमध्ये सांगितले की, ट्विटर आजपासून क्रियटर्सच्या रिप्लाय थ्रेडमध्ये दिसणार्‍या जाहिरातींसाठी जाहिरात महसूल शेअर करेल. यासाठी पात्र होण्यासाठी खाते ट्विटर ब्लूचे सदस्य असणे आवश्यक आहे. मस्कच्या पोस्टवर अनेक युजर्सनी आपले मत व्यक्त केले. एका युजर्स विचारले, ट्विटरमध्ये महसूलाचे विभाजन कसे दिसेल? दुसर्‍याने टिप्पणी केली की, तार्किकदृष्ट्या ते कसे दिसेल?

ब्लू टिक युजर्ससाठी ट्विटर अपडेट : गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये ट्विटरने त्यांच्या ब्लू टिक सेवेसाठी सुविधांची यादी अपडेट केली होती. या सेवेच्या ग्राहकांना संभाषणात प्राधान्यक्रमांक मिळणार असल्याचे नमूद करण्यात आले होते. अपडेट केलेल्या पेजमध्ये असेही नमूद करण्यात आले आहे की, ग्राहक वेबवरून 60 मिनिटांपर्यंतचे व्हिडिओ 1080p रिझोल्यूशन आणि 2GB फाइल आकारात अपलोड करू शकतात. परंतु सर्व व्हिडिओंनी कंपनीच्या नियमांचे पालन केले पाहिजे.

ब्लू टिक सर्व्हिस सबस्क्रिप्शनचा विस्तार : 3 फेब्रुवारीला ट्विटरने ब्लू टिक सर्व्हिस सबस्क्रिप्शनचा विस्तार सहा नवीन देशांमध्ये केला आहे. ही सशुल्क योजना आता सौदी अरेबिया, फ्रान्स, जर्मनी, इटली, पोर्तुगाल आणि स्पेनमध्ये उपलब्ध आहे. अशा प्रकारे एकूण 12 क्षेत्रे तयार केली गेली आहेत जिथे वापरकर्ते ट्विटर ब्लूचे सदस्यत्व घेऊ शकतात.

व्हॉट्सॲपने आक्षेपार्ह खात्यांवर बंदी घातली : व्हॉट्सॲपने आयटी नियम 2021 अंतर्गत भारतातील लाखो आक्षेपार्ह खात्यांवर बंदी घातली आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाने नागरिकांच्या अधिकारांचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने काही सुधारणा जाहीर केल्या आहेत, त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. आता व्हॉट्सॲप वर आक्षेपार्ह पोस्ट करणे महागात पडू शकते. कंपनीने म्हटले आहे की, 1 डिसेंबर ते 31 डिसेंबर दरम्यान, 3,677,000 व्हॉट्सॲप खाती बॅन करण्यात आली होती. त्यापैकी 1,389,000 खाती वापरकर्त्यांकडून कोणताही अहवाल येण्यापूर्वी सक्रियपणे बॅन करण्यात आली.

हेही वाचा : Meta Removed Bad Content : मेटाने भारतात फेसबुकसह इंस्टाग्रामवरील 34 दशलक्षाहून अधिक खराब सामग्री काढली

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.